Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Lockdown चा फटका गरीबांना, मजुर, छोट्या व्यावसायिकांना सर्वाधिक - आनंद महिंद्रा

Lockdown चा फटका गरीबांना, मजुर, छोट्या व्यावसायिकांना सर्वाधिक – आनंद महिंद्रा

याआधीसारख्या लॉकडाऊनची महाराष्ट्राला सध्या तरी गरज नाही

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात लॉकडाऊनबाबतचे ठाकरे सरकारकडून नुकतेच निर्देश देण्यात आले आहेत. टास्कफोर्सच्या बैठकीनंतर लॉकडाऊनबाबतचे संकेत सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. ठाकरे सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले आहे. तर दुसरीकडे आता उद्योग जगतातूनही यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महिंद्रा एण्ड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी लॉकडाऊनच्या मुद्दयावर आपले मत मांडले आहे. अतिशय नम्र अशा भाषेत त्यांनी आपले म्हणणे एक ट्विट करून मांडले आहे. लॉकडाऊनची झळ बसणाऱ्यांचा आवाज आणि अडचणीत येणाऱ्या घटकाबाबतचे मत त्यांनी आपल्या ट्विटमधून मांडले आहे. त्याचवेळी लॉकडाऊन कोणासाठी आणि कशासाठी आवश्यक आहे हेदेखील सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून केला आहे.

काय म्हटले आहे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये

मूळ अडचण ही आहे उद्धवजी, लॉकडाऊनचा फटका हा सर्वाधिक गरीबांना बसतो आहे. त्याचप्रमाणे याचा फोटा सर्वाधिक असा स्थलांतरीत मजुर आणि छोट्या व्यवसायांना बसतो आहे. खर तर याआधी झालेल्या लॉकडाऊनचा उद्देश हा हॉस्पिटल बांधणी आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठीचा होता. तसेच आरोग्याचा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठीचा होता. म्हणूनच आपल्याला गरज आहे ती म्हणजे या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची. तसेच मृत्यूदर कमी करणे हा आपला उद्देश असायला हवा असेही आनंद महिंदा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य आणि गरीब जनतेचे होणारे हाल याकडेच आनंद महिंद्रा यांनी लक्ष वेधले आहे. लॉकडाऊनच्या घोषणेनंतरच अनेक परप्रांतीय मंजुरांनी मिळेल त्या साधनातून आपले मूळ राज्य गाठले होते. लॉकडाऊनमध्ये रोजगाराचा आणि अन्नाचा असा दुहेरी फटका या घटकालाही बसला होता. तसेच या काळात अनेकांचे रोजगार जातानाच छोट्या व्यवसायांनाही मोठा फटका बसला होता. अनेक व्यवसाय हे या फटक्यातून पुन्हा सावरूच शकले नाहीत. म्हणूनच आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमधून या घटकाकडे ठाकरे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये पूर्वीसारखा लॉकडाऊन करण्याची गरज नससल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच यापुढच्या काळात मृत्यूदर रोखण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे असेही आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

 


 

- Advertisement -