नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषद सध्या राजधानी दिल्लीत सुरू आहे. या शिखर परिषदेत जगभरातील देशांचे राष्ट्राध्यक्ष सहभागी झाले आहे. या सर्व पाहुण्यांच्या आगमानने दिल्ली नव्या नवरीसारखी सजविण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला असून, त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहे.(There is no need to hide poverty in front of foreign guests; Rahul Gandhi attacks the government)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर सरकार झोपड्या लपवल्याचा किंवा पाडल्याचा आरोप केला आहे. एवढेच नव्हे तर या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भटक्या प्राण्यांना पकडून डांबले जात असल्याचा आरोप लावत ते म्हणाले की, भारताचे वास्तव पाहुण्यांपासून लपवण्याची गरज नाही.
ट्वीट करून साधला सरकारवर निशाणा
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले की, केंद्र सरकार आपल्या देशातील गरिबी आणि मुक्या भटक्या प्राण्यांना विदेशी पाहुण्यांपासून लपवत आहेत. ते म्हणाले की, पाहुण्यांपासून भारताचे वास्तव लपवण्याची गरज नाही. यासोबतच कॉंग्रेस पक्षाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात झोपडपट्ट्या हिरव्या चादरीने झाकल्या जात आहेत. दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेत जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांचे नेते सहभागी झाले आहेत.
हेही वाचा : G-20 मध्ये देशाचे नाव BHARAT : प्रथमच आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात INDIA नाव गायब
जयराम रमेश यांनीही धरले धारेवर
पंतप्रधानांवर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘जी-20 चा उद्देश जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचा एक उत्पादक मेळावा आहे, ज्याचा उद्देश जागतिक समस्यांना सहकार्याने हाताळणे आहे. मात्र या आलेल्या विदेशी पाहुण्यांसाठी झोपडपट्ट्या झाकून ठेवत आहेत किंवा पाडून टाकत आहेत, यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. पंतप्रधानांची प्रतिमा वाचवण्यासाठी भटक्या प्राण्यांना पकडून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही जयराम रमेश यांनी केला आहे.
हेही वाचा : G-20 च्या सदस्य संख्येत झाली वाढ; मोदींनी केली आफ्रिकन युनियनची घोषणा
राज्यपाल, मुख्यमंत्र्याच्या विमान प्रवासावर बंधने नाही
सध्या सुरू असलेल्या जी-20 शिखर परिषदेदरम्यान राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या राज्याच्या विमानाने दिल्ली किंवा आसपासच्या भागात प्रवास करण्यावर कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत. अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रसिद्धी पत्रक काढत जाहीर केले आहे.