Maharashtra Corona: पुण्यातील ३६ गावांमध्ये अजूनही कोरोनाची नो एंट्री

Coronavirus: Third wave of coronavirus peaks in next three weeks; Research by SBI
Coronavirus : पुढील तीन आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट उच्चांक गाठणार ; 'SBI'चे संशोधन

राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून ४० हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. असे असूनही दुसऱ्याबाजूला पुण्यातील ३६ गावांमध्ये मार्च २०२० पासून अजून एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याचे समोर आले आहे. म्हणजेच या गावांमध्ये कोरोनाचा प्रवेश झालाच नाहीये. पुण्यातील तब्बल ११४८ गावे कोरोनामुक्त झाली असून एकही कोरोनाबाधित नसल्याचे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेकडून काल, गुरुवारी स्पष्ट करण्यात आले आहे.

गाव कोरोनामुक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर अनोखी योजना आली राबवण्यात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे जिल्हात ग्रामीण पातळीवर अनेक उपयायोजना राबवण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे गावाला कोरोनापासून रोखण्यासाठी ग्रामपंचायतींना गाव कोरोनामुक्त करा आणि २० लाख मिळवा अशी योजना जाहीर करण्यात आली आहे. १५ मार्चपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. दरम्यान ज्या गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही, ही दुर्गम भागातील गावे आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी या दुर्गम भागातील गावात एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

एकही कोरोनाबधित न सापडलेली गावे

तालुका – भोर, गावे – डपणेवाडी, वावेघर, शिवनगरी, पऱ्हर बु. आणि खु., माझेरी, धानवली, कुडली खु., हिडरेशी, वरवंड, अभिपुरी, शिळींब, डेरे, भांड्रवली, उळशी, बोपे, डेहान

तालुका – खेड, गावे – कोहिंदू खु., खारवली, तोरणे खु., आढे, येणवे खु., पर्सूल, खारपूड, माजगाव, वेल्हावळे आणि माळवाडी-ठाकरवाडी

तालुकावेल्हा, गावे – गिवशी, गोडेखळ, घोल, हरपूड, कोशिमघर, खारीव, मेटपिलावरे, टेकपोले आणि वडघर

कोरोनामुक्त झालेल्या गावांची संख्या

 • भोर तालुक्यातील १३९ गावे कोरोनामुक्त
 • बारामती तालुक्यातील ७१ गावे कोरोनामुक्त
 • दौंड तालुक्यातील ४९ गावे कोरोनामुक्त
 • इंद्रापूर तालुक्यातील १२० गावे कोरोनामुक्त
 • जुन्नर तालुक्यातील ११४ गावे कोरोनामुक्त
 • हवेली तालुक्यातील ८९ गावे कोरोनामुक्त
 • खेड तालुक्यातील १३२ गावे कोरोनामुक्त
 • मावळ तालुक्यातील १२७ गावे कोरोनामुक्त
 • मुळशी तालुक्यातील ११० गावे कोरोनामुक्त
 • शिरुर तालुक्यातील ७७ गावे कोरोनामुक्त
 • वेल्हा तालुक्यातील १२० गावे कोरोनामुक्ते
 • एकूण पुणे जिल्ह्यातील ११४८ गावे कोरोनामुक्त

हेही वाचा – आरोग्य मंत्र्यांना कमी लेखता का?, पंतप्रधानांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवरुन राऊतांचा भाजपला सवाल