घरअर्थजगतनोटांच्या छपाईला मर्यादा असणं गरजेचं - रघुराम राजन

नोटांच्या छपाईला मर्यादा असणं गरजेचं – रघुराम राजन

Subscribe

कोरोनामुळे देशाची आर्थिक स्थिती डगमगली आहे. ही आर्थिक घडी सावरण्यासाठी अधिक नोटांची छपाई करावी, असं मत अनेक अर्थतज्ञांनी व्यक्त केलं आहे. मात्र असं असतानाच अधिक नोटांची छपाई फारशी फायद्याची ठरणार नाही, असं मत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. गुरुवारी सिंगापूरच्या डीबीएस बँकेद्वारे आयोजित एका वेबिनरमध्ये राजन यांनी यावर भाष्य केलं.

आधिच भारताचा विकासदर हा खाली घसरलेला असताना कोरोना संकटाची देखील भर पडली आहे. कोरोनामुळे पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंद्यांना ब्रेक लागला. याचा थेट परिमाण देशाच्या आर्थिक परिस्थितीवर झाला आहे. देशाच्या याच आर्थिक परिस्थितीवर आपली मतं रघुराम राजन यांनी यावेळी मांडली. अधिक नोटा छपाईसंदर्भात देखील त्यांनी हा पर्याय फारसा योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

यावर अधिक बोलताना राजन यांनी म्हटलं, अधिक प्रमाणात नोटांची छपाई करून त्या वापरात आणण्याला एक मार्यदा आहे. तसंच हा उपाय अल्पावधीसाठी काम करेल. तर असं नोटा छापणं कधी पर्यंत करत राहणार असा सवाल देखील यांनी उपस्थित केला. जेव्हा लोकं नोटांच्या छपाई संदर्भात काळजी करू लागतील तेव्हा की, जेव्हा आपल्यावरील कर्जाची परतफेड करण्याची चिंता व्यक्त करणार तेव्हा नोटा छपाई बंद करणार? याहून अधिक विकास दर वाढल्यानंतर बँका केंद्रीय बँकेकडे पैसे ठेवण्याऐवजी दुसरा पर्याय वापरतील तेव्हा ही छपाई थांबले का? असं राजन म्हणाले.

दरम्यान, नोटा छपाई झाली तरी त्याला मर्यादा असणं गरजेचं असल्याचं राजन यांनी अधोरेखित केलं. सध्याच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणत कर्ज घेतलं जातं नाही आहे. अशावेळी केंद्रीय बँक अतिरिक्त नोटा बाजारात आणू शकते. असं केल्याने केंद्रीय बँक आणि सरकारमध्ये ताळमेळ बसेल. परंतु असं असलं तरी, याला एक ठराविक मर्यादा आहे. तसंच भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा पूर्वपदावर आल्यावर त्याचा खासगी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम दिसू लागेल. त्यामुळे घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड होणार नाही. अशा स्थितीत बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध आहे किंवा नाही याचा आढावा सरकारला घ्यावा लागेल, असं राजन यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -