घरदेश-विदेशदेशातील वेगवेगळ्या सरकारी,खासगी वेबसाईट्सवर सायबर हल्ले, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

देशातील वेगवेगळ्या सरकारी,खासगी वेबसाईट्सवर सायबर हल्ले, महाराष्ट्राला सर्वाधिक फटका

Subscribe

प्रेषित मोहम्मद यांच्यासंदर्भात करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्यावरुन अल- कायदा दहशतवादी संघटनेने भारतीतील वेगवेगळ्या शहरांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. यानंतर देशातील वेगवेगळ्या सराकरी आणि खासगी वेबसाईट्सवर या मुद्द्यावरुन सायबर हल्ले झाले आहेत. यामध्ये नागपूमधील शासकीय विज्ञान संस्थेच्या वेबसाईटचा समावेश आहे. हॅक करण्यात आलेल्या वेबसाईट्सवर वादग्रस्त संदेश झळकत असून त्यात आम्ही शांत बसणार नाही’, असा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट –

- Advertisement -

या सायबर हल्ल्याचा फटका महाराष्ट्राला बसला असून राज्यातील 50 वेबसाईट्स हॅक झाल्या आहेत.ड्रॅगन फोर्स मलेशिया नावाच्या हॅकर्स ग्रुपने देशातील अनेक वेबसाईट्सवर हल्ले केले आहेत. यामध्ये इस्त्रायलमधील भारतीय दुतावासाच्या वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापनाची वेबसाईट, आणि कृषी संसोधन केंद्राच्या वेबसाईट्सचा समावेश आहे. या वेबसाईट्ससोबत इतर अनेक वेबसाईटवर सायबर हेल्ले करण्यात आले आहेत.

70 पैकी 50 वेबसाईट महाराष्ट्रातील –

- Advertisement -

सायबर हल्ला झालेल्या वेबसाईटच्या यादीमध्ये दिल्ली पब्लिक स्कूल भवन्स आणि इतर शैक्षणिक संस्थानच्या वेबस्टाईसचा समावेश आहे. सायबर हल्ले करण्यात आलेल्या 70 पैकी 50 वेबसाईट्स या महाराष्ट्रीत आहेत. यापैकी अनेक वेबसाईट्सवर या हॅकर्सने ऑडिओ नोट पोस्ट केली असून यात तुम्हाला ज्याप्रमाणे तुमचा धर्म आहे तसाच आमच्यासाठी आमचा धर्म आहे, असे वाक्य ऐकू येत आहे.

असेच हल्ले १८७७ नावाने ओळखल्या जाणाऱ्या दुसर्‍या हॅकर्स ग्रुपनेही केले होते. त्यांनी इतर पोर्टल्ससह महाराष्ट्रातील विधी अकादमीच्या वेबसाईटही हॅक केली आहे. या वेबसाईटवर या ग्रुपचा मेसेज असा होती की, “आम्हाला भारतीय लोकांशी कोणतीही अडचण नाही. ते त्यांचा धर्म निवडण्यास स्वतंत्र आहेत, पण आम्ही त्यांना आमच्या धर्मावर आक्रमण करू देणार नाही. आकडेवारी दर्शविते की जून-जुलै २०२१ मध्ये देखील, ड्रॅगनफोर्सने इस्त्रायली सरकारच्या वेबसाइट्सवर अनेक हल्ले केले होते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -