Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, तर्क मांडत ठाकरे गटाचा दावा

‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, तर्क मांडत ठाकरे गटाचा दावा

Subscribe

मुंबई : भाजपाचे सनातन धर्मावरील प्रेम उतूमातू लागले आहे. आपण व आपले अंधभक्त म्हणजे हिंदू अशा अंडकोशात ते वावरत आहेत. तामीळनाडूतील द्रमुक पक्षाने सनातन धर्मावर विचित्र टीकाटिपण्या सुरू केल्याने आता ‘इंडिया’ आघाडीचे काय व कसे होणार, अशा चिंता भाजपास पडल्या, पण हाच ‘द्रमुक’ पक्ष कधीकाळी भाजपाप्रणीत ‘एनडीए’चाही घटक होता व आज त्यांचे जे धर्मविचार आहेत, तेच त्या काळातही होते. द्रमुक ‘एनडीए’त असताना तेव्हा काही झाले नाही. त्यामुळे ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

हेही वाचा – Sanatana Dharma row : भाजपाच्या सनातन धर्माचा हा खरा चेहरा, ठाकरे गटाची कडाडून टीका

- Advertisement -

सत्तावीस प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ आघाडी निर्माण केली. त्याची इतकी धास्ती भाजपाने घेतली की, ‘इंडिया’चे नाव छुप्या पद्धतीने बदलून त्यांनी ‘भारत’ पुकारायला सुरुवात केली. इंडिया हा शब्द त्यांनी पाहिला किंवा ऐकला की त्यांना घाम फुटतो. सनातन धर्म इतका डरपोक आणि हतबल कधीच नव्हता, असे सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुनावले आहे.

हिमाचलमध्ये धर्माच्या अतिरेकाचा पराभव

आज भाजपासोबत असलेल्या ‘अण्णा द्रमुक’ पक्षाचे विचार, भूमिका या सनातन धर्माबाबत ‘द्रमुक’प्रमाणेच आहेत. दुसरे म्हणजे फक्त ‘द्रमुक’ म्हणजे ‘इंडिया’ आघाडी नाही. त्यामुळे भाजपाने उगाच नको तिथे खाजवत बसण्याची गरज नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. पी. नड्डा यांनी आता सांगितले की, ‘‘सनातन धर्माला लक्ष्य करण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा छुपा कार्यक्रम आहे.’’ नड्डा म्हणतात, ‘‘सनातन विचारधारेच्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी एकत्र झाली आहे.’’ डॉ. नड्डा हे हिमाचल प्रदेशातून येतात. ते त्यांचे गृहराज्य आहे. त्यांच्या राज्यात धर्माच्या अतिरेकाचा पराभव झाला असून नड्डा व त्यांचे लोक सांगतात तो हिंदू धर्म किंवा संस्कृती नाही, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही आजोबांच्या विचाराचे नाही राहू शकला तर मग…; भाजपचे आदित्य ठाकरेंना उत्तर

…म्हणून जगात सनातन धर्माची नाचक्की

सनातन धर्म म्हणजे फक्त पोथ्या, पुराणे, वेद नाहीत. मानवता व शुद्ध आचरण, मातृभूमीचे रक्षण अशा कर्तव्याचे पालन करणे हेसुद्धा धर्मकर्तव्य आहे. आज जो धर्म विकृत व हिडीस स्वरूपात भाजपाने समोर आणला त्यापासून देशाला आणि समाजाला धोका आहे. त्यामुळे जगात सनातन धर्माची नाचक्की होत आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

- Advertisment -