Russia-Ukraine War: UNGAमधील मतदान प्रक्रियेत ‘या’ पाच देशांनी उघडपणे रशियाला दिला पाठिंबा

these five countries that openly supported russia in voting of united nations
Russia-Ukraine War: UNGAमधील मतदान प्रक्रियेत 'या' पाच देशांनी उघडपणे रशियाला दिला पाठिंबा

संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA Resolution) काल, बुधवारी रशिया विरोधात निषेध प्रस्ताव मांडला गेला. ज्यामध्ये १४१ देशांनी प्रस्तावाच्या समर्थनार्थ मतदान केले तर ५ देशांनी विरोधात मतदान केले. भारतासह ३५ देश या प्रस्तावासंबंधातील मतदान प्रक्रियेपासून दूर राहिले. रशियाच्या बाजूने मतदान करणाऱ्या देशांमध्ये बेलारुस, डेमोक्रेटिक पीपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया (नॉर्थ कोरिया), ईस्ट आफ्रिका देश एरितरेया, रशिया आणि सिरियन अरब रिपब्लिक (सीरिया) सामिल आहेत.

दरम्यान संयुक्त राष्ट्र महासभेतील रशिया निषेध प्रस्तावसंदर्भातील मतदानाच्या वेळी ३५ देश गैरहजर होते. यामध्ये चीन, भारत, श्रीलंका, बांग्लादेश, एंगोलिया, दक्षिण आफ्रिका, अल्जीरिया, इराण, बोलिविया, इराक, क्यूबा, नमिबिया, व्हिएतनाम, निकारागुआ, झिम्बावे, किरगिस्तान आणि मंगोलियासह इतर देशांचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रात भारत म्हणाला की, तात्काळ युद्ध संपवण्याच्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या आवाहनाला ते समर्थन देतात. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढणे हे पहिले प्राधान्य आहे. दरम्यान भारताने भारतीयांना बोर्डर पार केल्यामुळे त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. भारत म्हणाला की, रशिया-युक्रेनमधील मतभेद बातचितच्या माध्यमातून दूर केले जाऊ शकतात.

दरम्यान रशिया-युक्रेन युद्धाच्या सहाव्या दिवशी एका भारतीयांचा मृत्यू झाला असून त्याचा साथीदार जखमी झाला होता. जेव्हा ते खाद्यपदार्थ आणण्यासाठी गेले होते, तेव्हा त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला आणि यामध्ये कर्नाटकच्या नवीन शेखरप्पा नावाच्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.


हेही वाचा – ‘आपण पुतिन यांना युद्ध रोखण्यासाठी सांगू शकतो?’; सर्वोच्च न्यायालयात CJIचा सवाल