देशातील ‘या’ पाच राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका – आरोग्य मंत्रालय

सध्या दिल्ली कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढ असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

these Five states account for 62% of total active cases in the country Health Ministry
देशातील 'या' पाच राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका - आरोग्य मंत्रालय

देशात कोरोना विषाणूचा प्रसार थांबायचं नावाचं घेत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढताना दिसत आहे. देशातील कोरोनाच्या एकूण Active रुग्णांपैकी ६२ टक्के प्रकरणे फक्त पाच राज्यात आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू ही देशातील पाच राज्यात आहेत. या पाच राज्यातील एकूण Active रुग्णांपैकी २५ टक्के प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूत एकूण Active रुग्ण १२ टक्के आहेत. देशातील एकूण मृत्यूपैकी ३७ टक्के कोरोनाचे बळी महाराष्ट्र झाले आहे. तसेच एकूण मृत्यूपैकी ७० टक्के मृत्यू देशातील या पाच राज्यांमध्ये झाले आहेत.

कर्नाटकमध्ये ९.५ टक्के आणि दिल्ली ५० टक्के कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजीव भूषण यांनी सांगितले आहे. आतापर्यंत देशात ४.५० कोटी कोरोनाच्या टेस्ट झाल्या आहेत. याशिवाय २९.७० लाख लोक कोरोनाचा उपचार घेऊन ठिक झाले आहेत. देशात सध्या कोरोनाचे Active प्रकरणे ८.१५ लाख आहे. म्हणजे रिकव्हर होण्याचे प्रमाण Active प्रकरणांपेक्षा तिप्पट आहे. गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात कोरोना Active प्रकरणांमध्ये ७ टक्के घट झाली, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली.


हेही वाचा – कोरोनाबाधित गंभीर रुग्णांचे प्राण वाचवू शकतात ‘हे’ दोन स्टिरॉइड – WHO