या प्लास्टिक वस्तू १ जुलैपासून वापरता येणार नाहीत, सरकारने तयार केला कृती आराखडा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक जुलैपासून पूर्णपणे बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकची यादीही जारी केली आहे. या बंदी घातलेल्या सर्व उत्पादनांना पर्याय म्हणून 200 कंपन्या उत्पादने बनवत आहेत. यासाठी त्यांना परवान्याचे नूतनीकरण करण्याची गरज नाही. 

पर्यावरण रक्षणासाठी केंद्र सरकारने 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक बंद ( ban single use plastics) करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून सिंगल यूज प्लास्टिक विकणाऱ्यांवर तसेच वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सरकारने देशात सिंगल यूज प्लास्टिकविरोधात कृती आराखडा तयार केला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यासाठी कठोर नियम केले आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने एक जुलैपासून पूर्णपणे बंदी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिकची यादीही जारी केली आहे. या बंदी घातलेल्या सर्व उत्पादनांना पर्याय म्हणून 200 कंपन्या उत्पादने बनवत आहेत. यासाठी त्यांना परवान्याचे नूतनीकरण करण्याची गरज नाही.

या प्लास्टिकवर बंदी

– प्लास्टिकचे काड्या असलेले ईयर बड्स

– फुग्याची प्लास्टिकची काठी

– प्लास्टिकचे ध्वज

– कँडी स्टिक

– आइस्क्रीम स्टिक

– थर्माकोल

– प्लास्टिक प्लेट्स

– प्लास्टिक कप

– प्लास्टिक पॅकिंग साहित्य

– प्लास्टिकची आमंत्रण पत्रिका

– सिगारेटची पाकिटे

– प्लास्टर आणि पीव्हीसी बॅनर (100 मायक्रॉनपेक्षा कमी)

सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे काय?

एकदा वापरल्यानंतर फेकून द्यावे लागते ते प्लास्टिक म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक. १०० मायक्रॉनपेक्षा कमी जाड असणारे सर्व प्रकारचे प्लास्टिक यामध्ये मोडते. या प्लॅस्टिकची सहजासहजी विल्हेवाट लावता येत नाही. तसेच त्याचा पुनर्वापर करता येत नाही. प्लास्टिकपासून होणाऱ्या प्रदूषणामध्ये सिंगल यूज प्लॅस्टिकचा सर्वाधिक वाटा आहे.