घरट्रेंडिंगRule Changing From 1st August: पुढच्या महिन्यापासून बदलणार 'हे' नियम, खिशाला बसणार...

Rule Changing From 1st August: पुढच्या महिन्यापासून बदलणार ‘हे’ नियम, खिशाला बसणार फटका

Subscribe

उद्यापासून ऑगस्ट महिना सुरू होत असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासून काही नियमांमध्ये बदल होत आहेत. या नियमांमध्ये तुमच्या पगाराशी संबंधित काही बदल, पेन्शन मिळवणे, पेमेंट करणे, रोख रक्कम काढणे, डोअरस्टेप बँकिंगचा लाभ घेणे यासरख्या गोष्टींचा समावेश आहे. यासोबतच १ ऑगस्टपासून तुम्हाला कार आणि बाईक खरेदी करणे देखील तुम्हाला महागात पडणार आहे. त्यामुळे जाणून घ्या, १ ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे.

१. ट्रेडिंग खात्याच्या KYC साठी आज शेवटचा दिवस

डिमॅट किंवा ट्रेडिंग खाते असलेले गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यांनी जर शनिवारी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर उद्यापासून त्यांचं अकाऊंट निष्क्रिय होईल. एप्रिलमध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (सीडीएसएल) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) यांनी यासंदर्भात एक परिपत्रक देखील जारी केले होते. केवायसीच्या माहितीवजा तपशीलामध्ये गुंतवणूकदारांना नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पॅन नंबर, ईमेल आयडी आणि उत्पन्नाची श्रेणी देणं आवश्यक आहे. दरम्यान, अनेक स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांनी आपल्या क्लायंट्सना ईमेल किंवा पत्र पाठवून याबद्दल चेतावणी दिली आहे.

- Advertisement -

२. सुट्टीच्या दिवशीही जमा होणार पगार-पेन्शन

१ ऑगस्टपासून आता पगार, ईएमआय आणि पेन्शन सुट्टीच्या दिवशी देखील जमा करण्यात येणार आहे. उद्यापासून नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस (NACH) ची सुविधा आता आठवड्याच्या सर्व दिवसांमध्ये उपलब्ध असणार आहे. NACH चे काम केवळ पगार आणि व्याज इत्यादी देणे नाही, तर NACH वीज, गॅस, टेलिफोन, पाणी, कर्जाचे हप्ते म्हणजेच EMI, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक आणि विमा प्रीमियम यासंदर्भात देखील काम आता NACH कडे असणार आहे. आतापर्यंत ही सुविधा फक्त बँकांच्या कामकाजाच्या दिवशी उपलब्ध होती मात्र आता 24×7 ही सेवा असणार आहे.

३. दूसऱ्या बँक ATM मधून पैसे काढणं होणार महाग

रिझर्व्ह बँकेने इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी इंटरचेंज शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे. यानियमानुसार आता १५ रुपयांवरून हे शुल्क १७ रुपये करण्याची घोषणा केली. त्यानुसार, गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी ५ रुपयांवरून ६ रुपये होणार आहे. साधारण ९ वर्षांनंतर ही फी वाढवली असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

४. डोरस्टेप बँकिंग चार्ज

१ ऑगस्टपासून इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्राहकांकडून डोअरस्टेप बँकिंगसाठी शुल्क आकारणार असल्याचे सांगितले जात आहे. यानियमानुसार, निवडक उत्पादने आणि सेवांसाठी, प्रत्येक रिक्वेस्टवर २० रुपये अधिक जीएसटी भरावा लागणार आहे. या सेवांमध्ये पैसे काढणे, रोख रक्कम जमा करणे, एखाद्याच्या किंवा दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणे, सुकन्या समृद्धी खात्याशी संबंधित सेवा, PPF, RD यांचा समावेश असणार आहे. म्हणून जर तुम्हाला देखील यापैकी कोणत्याही सेवांच्या डोअरस्टेप बँकिंगचा लाभ घ्यायचा असेल तर अधिक पैसे द्यावे लागणार आहे.

५ . कार, बाईक्स होणार महाग

टोयोटाने इनोव्हा क्रिस्टाच्या किंमतीत २ टक्क्यांची वाढ जाहीर केली आहे. जपानी दुचाकी उत्पादक कावासाकी इंडिया आपली मोटारसायकल ६ हजार ते १५ हजार रुपये महाग करणार आहे. टाटा मोटर्सनेही आपल्या गाड्या महाग करण्याविषयी सांगितले आहे. स्टीलसह ऑटोमोबाईल क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे कार आणि बाईक महाग होणार असल्याची माहिती समोर येत आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिंमत सरमा यांच्याविरोधात एफआयआर दाखल, खुनाचा कट रचल्याचा आरोप

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -