घरताज्या घडामोडी'या' ६ वॅक्सीन कोरोनावर करणार मात

‘या’ ६ वॅक्सीन कोरोनावर करणार मात

Subscribe

कोरोनावर मात करण्यासाठी वॅक्सीनचा शोध लावण्यात आला आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जगातील अनेक देश कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संशोधन करत आहे. मात्र, अद्याप कोरोना या विषाणूवर कोणतीही लस किंवा औषध सापडलेले नाही. या विषाणूवर मात करण्यासाठी वैज्ञानिकांकडून प्रयत्न सुरु असून याकरता ९० जणांची टीम तयार करण्यात आली आहे. यातील सर्वजण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत. पण, अद्याप यश आलेले नाही. मात्र, यातील ६ वैज्ञानिक यशाच्या ध्येयाकडे पोहोचले आहेत.

AD5-nCoV वॅक्सीन

- Advertisement -

चीन मधील कॅन्सिनो बायोलॉजिक्स कंपनीने १६ मार्च पासून कोरोनावर चाचण्या करण्यास सुरुवात केली आहे. या कंपनीसोबत चिन अकादमी ऑफ मिलिटरी मेडिकल सायन्सेस आणि इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेक्नॉलॉजी या दोन कंपन्या देखील कॅन्सिनोबरोबर काम करत आहेत. या कंपनीने वॅक्सीन तयार करण्याकरता एनडेनोव्हायरसचा उपयोग केला आहे. चीन या एनडेनोव्हायरसला शरीरात सोडून कोरोना व्हारसचा नाश करणार असल्याचे बोले जात आहे. तसेच या लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होणार आहे.

LV-SMENP-DC वॅक्सीन

- Advertisement -

चीनच्या शेंझेन जीनोइम्यून इन्सिट्यूटने एक वॅक्सीन तयार केले आहे. जे एचआयव्हीवर वापरले जाते. यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या घटकांचा वापर करण्यात आला आहे. तसेच ही लस व्हायरसवर परिणाम करणारी असून ती व्हायरसवर मात करणारी लस आहे.

तिसरी वॅक्सीन लस बनते वुहानला

चीनच्या वुहान येथील बायोलॉजिकल प्रॉडक्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये एक लस तयार केली जात आहे. जी लस कोरोना विषाणूवर मात करेल. तसेच ही तयार करण्यात आलेली लस संक्रमण होण्यापासून वाचवणार आहे, असे बोले जात आहे.

ब्रिटेनमध्ये सुरु आहे प्रयोग

ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीने ChAdOx1ने वॅक्सीन तयार करण्यात आले आहे. युरोपमध्ये याकरता २३ एप्रिल रोजी पहिले क्लीनिकल तयार करण्यात आले आहे. या क्लीनिकमध्ये सध्या वॅक्सीन तयार करण्यात येत आहे.

mRNA-1273 वॅक्सीन

अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्समध्ये बायोटेक्नॉलॉजी कंपनी मॉडर्ना थेरपीटिक्स एक अशी वॅक्सीन बनवत आहेत. ज्यामध्ये कोरोनावर मात करण्याचे घटक वापरण्यात आले आहेत. तसेच या वॅक्सीनमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शरीरात होणाऱ्या व्हायरसला आळा घालण्यास मदत होणार आहे.

INO-4800 वॅक्सीन

अमेरिकेच्या पेंसिलवेनियामध्ये फार्मा कंपनी इनोवियो नावाची वॅक्सीन तयार करत आहेत. यामध्ये बाधितांच्या शरीरातील प्लाझ्मिडमधून रुग्णाच्या पेशींमध्ये ती लस जाऊन कोरोनाशी लढण्यास मदत करेल.

जगभरात वैज्ञानिक वॅक्सीनचा शोध घेऊन ती लस तयार करत आहेत. मात्र, यापैकी कोणती लस कोरोनावर मात करु शकेल का? याची कोणतीही शाश्वती नाही, अस देखील सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – भारताच्या गेमचेंजर औषधाने केलं निराश; जगाला होती आशा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -