Corona In India: कोरोना वाढणाऱ्या राज्यांची पंतप्रधानांच्या बैठकीत मुस्कटदाबी, कोणत्या राज्यांची हुकली संधी?

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळाली.

these state not opportunity to speak at pm Narendra Modi video conferencing meeting
Corona In India: कोरोना वाढणाऱ्या राज्यांची पंतप्रधानांच्या बैठकीत मुस्कटदाबी, कोणत्या राज्यांची हुकली संधी?

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत दररोज मोठी भर पडत आहे. आज २ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण देशभर चिंतेचे वातावरण पसरले आहे. देशात सध्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोना केसेसमध्ये सर्वाधिक वाढ असल्याचे काल, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. असे असूनही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत चिंताजनक परिस्थिती असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याचे समोर आले आहे. फक्त आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीत बोलण्याची संधी मिळाली. बाकीच्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील परिस्थिती, बेड्स, ऑक्सिजनची उपलब्धता इत्यादींबाब लेखी स्वरुपात देण्यास सांगितले. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

सध्या देशात महाराष्ट्र, दिल्ली सारख्या मोठ्या राज्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव हा दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तसेच येथील पॉझिटिव्हिटी रेट देखील जास्त आहे. महाराष्ट्रात २२.३९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ३२.१८ टक्के, दिल्लीत २३.१ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये ४.४७ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाल्याचे बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले. तसेच नऊ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने होत असल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या कोरोना आढावाच्या बैठकीमध्ये या नऊ राज्यांमधील फक्त चारच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली. उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्थानिक कोरोना परिस्थितीचा आढावा हा लेखी स्वरुपात केंद्राला पाठवला.

पंतप्रधान मोदींच्या बैठकीत कोणत्या राज्याला मिळाली बोलण्याची संधी?

कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम आणि मणिपूर या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केंद्राकडून केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आभार व्यक्त केले. या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पंतप्रधानांसमोर सादर केला. पण सर्वाधिक कोरोनाचा परिस्थिती बिकट असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली, केरळ आणि गुजरातसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही.


हेही वाचा – Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यातील नव्या रुग्णसंख्येत किंचित घट; एकही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नाही