घरदेश-विदेश'या' राज्यांना उकाड्यापासून मिळणार दिलासा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

‘या’ राज्यांना उकाड्यापासून मिळणार दिलासा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट

Subscribe

देशातील काही राज्यांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. पण असे असताना हवामान विभागाने काही राज्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.

देशातील काही राज्यांमध्ये उन्हाच्या झळा तीव्र झाल्या असून अनेक राज्यात तापमानाचा पारा वाढलेला आहे. पण असे असताना हवामान विभागाने काही राज्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा (orange alert from meteorological department) दिला आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस काही राज्यांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाकडून पाच ते सात राज्यांमध्ये हा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात जुलै महिन्यासारखा धो-धो पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेली आहे.

आज मंगळवारी (ता. 02 मे) देशातील देखील काही भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तापमान हे नेहमीच्या तापमानापेक्षा कमी राहू शकते. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, ओडिशा, झारखंड, बिहार, कर्नाटक, तामिळनाडू, कराईकल, पुद्दुचेरी, पंजाब, नागालँड, मिझोराम, मणिपूर, कच्छ आणि सौराष्ट्र तसेच महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण तर गोव्यात देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पुढील पाच दिवस राज्यात वादळी पावसाची शक्यता; नांदेड, छत्रपती संभाजीनगरात पुन्हा अवकाळी पाऊस

सध्या देशात तेलंगणा, मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि तामिळनाडूच्या दूरच्या भागात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा, गंगेच्या पश्चिम बंगालमधील काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे तडाखा बसलेला आहे. तसेच, आज देखील या भागात गारपीट आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर तळ कोकणात देखील पावसाच्या हलक्या सरी बससू शकतात.

- Advertisement -

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान
मे महिन्यात देशातील काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने जुलै महिन्यात कोसळावा असा पाऊस कोसळत आहे. तर देशातील काही राज्यात असलेल्या नद्यांना पूर देखील आले आहेत. पण ऐन उन्हाळ्यात धो धो पाऊस कोसळत असल्याने याचा शेतीला मोठा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील काही भागात पिकांचे अतोनात नुकसान देखील झाले आहे. ज्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -