घरताज्या घडामोडीतीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर मुलांनी जन्मदात्याला सोडले रस्त्यावर

तीन कोटींची संपत्ती हडपल्यानंतर मुलांनी जन्मदात्याला सोडले रस्त्यावर

Subscribe

वडिलोपार्जित संपत्तीसाठी कोणी कोणाची हत्या करतंय तर कोणी आपल्या आई-वडिलांचं घराबाहेर काढून देत आहे. अशाच प्रकारची हृदयद्रावक घटना तेलंगणाच्या सिद्दीपेट जिल्ह्यातील मधिरा गावात घडली आहे. ३ कोटींची संपत्ती हडपल्यानंतर तीन भावांनी आपल्या ७९ वर्षांच्या वडिलांना रस्त्यावर सोडून दिलं असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी तिन्ही भावांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना हुजूरबाद कारागृहातील तुरुंगात पाठवले आहे. तसेच सध्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे शहरातील सरकारी रुग्णालयात ते उपचार घेत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, पोथू सुधाकर (वय ४५), पोथू जनार्दन (व. ४८) आणि पोथू रवींदर (वय ५२) अशी तिन्ही आरोपी मुलांची नावे आहेत. तिन्ही आरोपी मुलांनी वडील पोथू मल्ल्या यांची संपत्ती आपापसात वाटून झाल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडून दिलं. शिवाय त्यांनी आईकडून देखील चांदी-सोन्याचे दागिने घेतले. मात्र तिच्यावर नावावर आणखी सहा एकर जमीनची नोंद असल्यामुळे एका मुलाने तिला त्याच्यासोबत राहण्याची परवानगी दिली आहे.

- Advertisement -

मुलांनी गावकऱ्यांना धमकावले

पोलिस, महसूल अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून या तिघांनीही वडिलांची काळजी घेण्यास नकार दिला. तसेच त्यांनी वडिलांना जेवण देणाऱ्या गावकऱ्यांना देखील धमकावले. त्यामुळे त्यानंतर गावकऱ्यांनी या वृद्ध वडिलांना वृद्धाश्रमात दाखल केले, असे पोलिसांनी सांगितले. मधिरा गावाचे महसूल अधिकारी यांनी याप्रकरणी कोहेडा पोलिसांना लेखी तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी २००७ कलम २४ आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला.

कोहेडाचे एसआय राज कुमार टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले की, ‘या तिन्ही मुलांनी निष्ठुर असल्याचे दाखवून दिलं आहे. ग्रामस्थ, पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून त्यांना बाहेर काढलं. पोलिसांनी एफआयआरमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम २९० आणि ३२३ देखील समाविष्ट केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ज्या’ व्यक्तीवर कुटुंबियांनी अंत्यसंस्कार केले ‘तो’ दोन दिवसांनी दारात हजर झाला आणि…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -