घर देश-विदेश यासाठी रहावे लागते 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये

यासाठी रहावे लागते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये

Subscribe

सध्याच्या काळात 'लिव्ह इन रिलेशनशिप'चे फॅड आहे. मात्र झारखंडमधील काही गावात तरुण - तरुणींना काही कारणास्तव 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहाव लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्याच्या काळात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चे फॅड मोठ्या प्रमाणात आहे. मात्र असे असले तरी देखील काहींना नाईलाजाने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहावे लागत असल्याचे समोर आले आहे. झारखंडमधील एका गावात अनेक जोडपी नाईलाजाने अशा नात्यामध्ये राहत आहेत. या गावातील मंडळींकडे लग्नाचा खर्च करायला आणि गावजेवणं घालायला पैसेच नसल्याने या गावातील तरुण मंडळी २० ते ३० वर्षांपासून ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत.

स्वसंसेवी संस्थेने लावली १३२ लग्न

गुमला या गावात मोठ्या संख्येने तरुण मुल – मुली आहेत. या तरुण मुलामुलींना सामान्यांप्रमाणे लग्न करायचे आहे. मात्र त्यंनी परिस्थीती नसल्यामुळे त्यांना इतरांप्रमाणे लग्न करता येत नाही. २० ते ३० वर्षांपासून ही तरुणी पिढी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. मात्र गावजेवणं आणि लग्नाचा खर्च करायला पैसे नसल्याने या गावातील तरुण पिढी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. मात्र येथील एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेत नुकतेच येथील १३२ जोडप्यांचे लग्न लावून दिले आहे. तसेच यावेळी परंपरेनुसार गाव जेवणही घातले असल्याने हे गावकरी भलतेच आनंदात आहेत.

- Advertisement -

झारखंडमधील ओरांव, मुंडा आणि हो नावाच्या आदिवासी जमातीमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणारी जोडपी पाहायला मिळतात. मात्र त्यांची ऐपत नसल्याने ते ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत. लग्न न करता एकत्र राहण्याच्या या पद्धतीला येथे धुकुआ असे म्हटले जाते. तर महिला लग्न न करता समाजाच्या परवानगीने पुरुषाबरोबर राहू शकते. तिला धुकनी म्हणजे लग्न न करता पुरुषाच्या घरात राहणारी बाई असे संबोधले जाते. विशेष म्हणजे लग्न न करता पुरुषाची पत्नी म्हणून वावरणाऱ्या धुकनी म्हणजे बाईला पतीवर आणि मुलांवर अधिकार गाजवण्याचा अधिकार नसतो. मात्र ती त्यांची सेवा करु शकते. तसेच तिला सामान्य किंवा लग्न करुन आलेल्या महिलांसोबत ऊठबस करण्यास मनाई असल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -