मावशीपेक्षा आजी-आजोबा मुलाची जास्त चांगली काळजी घेतात, सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

मावशीपेक्षा आजी-आजोबा जास्त चांगली काळजी घेऊ शकतात, असं मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला.

Supreme Court orders SFIO to continue probe against Sahara Group

सर्वोच्च न्यायालयाने ६ वर्षांच्या एका मुलाची जबाबदारी त्याच्या आजी-आजोबांकडे सोपवली आहे. मावशीपेक्षा आजी-आजोबा जास्त चांगली काळजी घेऊ शकतात, असं मत व्यक्त करत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे या मुलाच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला होता. १३ मे २०२१ रोजी त्याच्या वडिलांचं निधन झालं तर १२ जून २०२१ त्याच्या आईचा मृत्यू झाला. (‘They take better care’: SC gives custody of boy orphaned by Covid to paternal grandparents)

या मुलासाठी त्याच्या आजी-आजोबांनी गुजरातच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या मुलाची जबाबदारी त्याच्या मावशीवर सोपवली. मावशी केंद्रीय सरकारी कर्मचारी असून एकत्र कुटुंबात राहते. त्यामुळे मुलाच्या भविष्याचा विचार करता त्याची जबाबदारी त्याच्या मावशीकडे सोपवण्यात यावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

मात्र आजी-आजोबांनी याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. आजी-आजोबांना पेन्शन सुरू असून ते मुलाची जबाबदारी स्विकारण्यास समर्थ असल्याचा युक्तीवाद कोर्टात मांडण्यात आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्वाळा रद्द करून मुलाची जबाबदारी आजी-आजोबांकडे सोपवली. भारतात मुलाची काळजी त्याच्या आई-प्रमाणेच त्याचे आजी-आजोबाही घेऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.