घरदेश-विदेशराजस्थान-महाराष्ट्रातील चोरांनी लंपास केलेल्या प्राचीन मूर्ती हस्तगत, 1970चे कारनामे उघड

राजस्थान-महाराष्ट्रातील चोरांनी लंपास केलेल्या प्राचीन मूर्ती हस्तगत, 1970चे कारनामे उघड

Subscribe

भारतातून चोरीला गेलेल्या आणि इंग्लंडमध्ये नुकत्याच हस्तगत केलेल्या आठव्या शतकातील दोन मूर्ती मायदेशी रवाना करण्या आल्या. लंडनमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हा कार्यक्रम झाला.

लंडन : भारतातून चोरीला गेलेल्या आणि इंग्लंडमध्ये नुकत्याच हस्तगत केलेल्या आठव्या शतकातील दोन मूर्ती मायदेशी रवाना करण्या आल्या. लंडनमध्ये परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी हा कार्यक्रम झाला. या दोन्ही मूर्ती 1970 साली महाराष्ट्र आणि राजस्थानच्या चोरट्यांनी उत्तर प्रदेशातून लंपास केल्या होत्या. (Thieves in Rajasthan-Maharashtra seize looted ancient idols, exploits of 1970s revealed)

हेही वाचा – …तर महाराष्ट्राचा युपी, बिहार होईल; राज ठाकरेंनी व्यक्त केली भीती

- Advertisement -

सन 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1980 च्या सुरुवातीच्या काळात उत्तर प्रदेशातील लोकारी येथील मंदिरातून चोरलेल्या योगिनी चामुंडा आणि योगिनी गोमुखी यांच्या मूर्ती लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाने इंडिया प्राइड प्रोजेक्ट आणि आर्ट रिकव्हरी इंटरनॅशनल यांच्या सहकार्याने परत मिळवल्या. केंद्रीय मंत्री जयशंकर पाच दिवसांच्या ब्रिटनदौऱ्यावर होते. या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी इंडिया हाऊसमध्ये या दोन्ही मूर्तींचे अनावरण करण्यात आले. भारत आणि इंग्लंड हे उभय देशांच्या संस्कृतीचा आदर करतो. त्याच अनुषंगाने सांस्कृतिक आदान-प्रदान देखील कायदेशीर मार्गाने तसेच पारदर्शकरीत्या केले जाते, असे ते म्हणाले.

- Advertisement -

मूर्ती परत करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण असे कोणी करत नाही. त्यामुळे संबंध अधिक सुधारतात. लोकहारी मंदिरात 20 योगिनी मूर्ती असल्याचे मानले जाते, ज्यात प्राण्यांचे डोके असलेल्या सुंदर स्त्रियांच्या रूपात दाखवले गेले आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – “…जय भवानी, जय शिवाजी म्हणत मते मागणार”, उद्धव ठाकरेंचे थेट निवडणूक आयोगाला आव्हान

राजस्थान-महाराष्ट्रातील चोरांचे कारनामे

सन 1970च्या दशकात दरोडेखोरांच्या एका गटाने मंदिरात लूटमार केली होती. हे सर्व चोरटे राजस्थान आणि महाराष्ट्रातून स्वित्झर्लंडमार्गे युरोपात मालाची तस्करी करायचे. त्यावेळी मोठ्या संख्येने पुतळ्यांची चोरी झाली होती, तर काही मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती आणि उरलेल्या मूर्ती स्थानिक ग्रामस्थांनी काढून लपवल्या होत्या.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -