Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Mumbai Fake Vaccination: बनावट लसीकरण प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तिसऱ्या FIR ची नोंद

Mumbai Fake Vaccination: बनावट लसीकरण प्रकरणात मुंबई पोलिसांकडून तिसऱ्या FIR ची नोंद

Related Story

- Advertisement -

बनावट लसीकरण शिबिर घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तिसऱ्या एफआयआरची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील कांदिवली, वर्सोवानंतर आता खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजेश पांडे, संजय गुप्ता आणि इतर ४ जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजेश पांडे, संजय गुप्ता आणि इतर ४ जणांवर कोकिलाबेन रुग्णालयाचे नाव वापरुन कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्याची खोटी माहिती देऊन लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. टिप्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण २६० लोकांसह कोविड लस देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा देखील आरोप आहे.

खार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआरमध्ये असे स्पष्टपणे लिहिले की आरोपींनी या लोकांना कोरोना लसीच्या नावाखाली काही भेसळयुक्त द्रव लोकांना लस म्हणून देण्यात आला होता. अशा प्रकाराने लोकांच्या आयुष्याशी खेळ सुरू असून त्याऐवजी २ लाख ८४ हजार ६९६ रुपये घेतले गेले. या एफआयआरमधून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की आरोपींनी कोविशील्डच्या जागी आणखी काही द्रव्य लोकांना देण्यात आले होते. खार पोलिसांच्या या एफआयआरआधी कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटी आणि वर्सोवाच्या एका उत्पादन कंपनीने स्वतंत्र एफआयआर दाखल केले आहेत.

कांदिवलीत ४ जण अटकेत

- Advertisement -

मुंबईतील कांदिवली भागातील हिरानंदानी सोसायटीमध्ये ३० मे रोजी खासगीरित्या करण्यात आलेले लसीकरण हे बनावट असल्याचे पालिकेने केलेल्या चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. या खासगी लसीकरणासाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. संशयित लससाठा देखील अनधिकृत पद्धतीने मिळविण्यात आल्याचे आणि ३९० लोकांना १२६० रुपये याप्रमाणे लस विकत देण्यात येऊन ४ लाख ९१ हजार रुपये उकळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणत्याही रुग्णालयाशी लसीकरणाबाबत करारनामा न करता हे बनावट लसीकरण करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. कांदिवली पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -