घरताज्या घडामोडीममता बॅनर्जींना शरद पवारांचा पाठिंबा, तिसऱ्या आघाडीसाठी दिल्ली किंवा मुंबईत होणार बैठक

ममता बॅनर्जींना शरद पवारांचा पाठिंबा, तिसऱ्या आघाडीसाठी दिल्ली किंवा मुंबईत होणार बैठक

Subscribe

केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांविरोधात गैर भाजप शासित राज्यांतील मुख्यमंत्र्यांना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्राद्वारे एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. यावर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केल्यामुळे खळबळ माजली आहे. आम्ही या मुद्दयावर एकत्र आहोत परंतु आमच्या बैठकीसाठी जागा ठरली नाही. बैठक मुंबई किंवा दिल्लीत होण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटंलं आहे. सध्या ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजेडीचे नेता नवीन पटनायक यांनी आपल्याला ममतांकडून पत्र मिळाले नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान टीएमसी सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगरभाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून भाजपच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले होते. तृणमूल काँग्रेसचे प्रमुख म्हणून लिहिलेल्या पत्रात, बॅनर्जी यांनी भाजपचा मुकाबला करण्याच्या रणनीतींवर चर्चा करण्यासाठी आणि एकजूट होण्याचा संकल्प करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्याचे आवाहन केलं आहे. कारण देशाला चांगले सरकार देता येईल.

- Advertisement -

ममतांनी पत्रात काय म्हटलंय?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे की, सत्ताधारी भाजपकडून या देशातील संस्थात्मक लोकशाहीवर थेट हल्ल्यांबद्दल माझी तीव्र चिंता व्यक्त करण्यासाठी मी तुम्हाला पत्र लिहित आहे. सर्वांना विनंती करते की, आपण सर्वांनी एक बैठक घेऊ जेणेकरुन देशाला पात्र असलेले सरकार देता येईल. भविष्यातील रणनितीवर चर्चा करता येईल.

ममतांच्या पत्रावर भाजप-काँग्रेसची प्रतिक्रिया

ममता बॅनर्जी यांनी भाजपवर ईडी आणि सीबीआयच्या कारवाईवरुन निशाणा साधला आहे. यावर भाजपने पलटवार केला आहे. टीमसीची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा धुळीला मिळाली आहे. काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्षाला भाजपविरोधात लढण्याची विश्वासर्हता नाही.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप खासदार वरुण गांधी-संजय राऊतांमध्ये डिनर डिप्लोमसी, ३ तासांच्या चर्चेवरुन राजकीय वर्तुळात खळबळ

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -