घरक्रीडाभारतात 'या' ठिकाणी तयार होणार जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान!

भारतात ‘या’ ठिकाणी तयार होणार जगातलं सर्वात मोठं क्रिकेटचं मैदान!

Subscribe

मेलबर्न क्रिकेट मैदानाला मागे टाकत अहमदाबाद येथे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलं आहे. या मैदानात १ लाखांपेक्षा जास्त प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे. मेलबर्नच्या मैदानाची प्रेक्षकक्षमता ही ८० हजार एवढी आहे. यानंतर जगातलं तिसरं मोठं क्रिकेट मैदानही भारतात तयार होणार आहे.  राजस्थानमध्ये हे मैदान तयार होणार आहे. या मैदानाची क्षमता ७५ हजार एवढी असणार आहे.

काय आहेत मैदानाची वैशिष्टये

- Advertisement -

जयपूरजवळील चौम्प गावाजवळ हे मैदान असणार आहे. १०० एकर जमिनीवर हे मैदान उभारलं जाणार आहे. इनडोअर प्रॅक्टीस, कार पार्किंग यासह अनेक अत्याधुनिक सेवा या मैदानात दिल्या जाणार आहेत. यासाठी ३५० कोटींचा खर्च या मैदानासाठी येणार आहे. या मैदानाचं डिजाईन तयार करण्यात आला आहे.  हे मैदान दोन टप्प्यांमध्ये बनवलं जाणार आहे. या विषयी राजस्थान क्रिकेट असोसिएशनने माहिती दिली आहे.

असा आहे पहिला टप्पा

मैदानाच्या पहिल्या टप्प्यात प्रेक्षकांना बसता येईल या पद्धतीने मैदान सुरू करण्यात येईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही क्षमता ७५ हजारापर्यंत वाढवली जाणार आहे. पहिल्या टप्प्याचं काम हे दोन वर्षांत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

- Advertisement -

राजस्थानच्या जयपूर शहरात सध्या ३० हजार आसन क्षमता असलेलं मैदान कार्यरत असून या मैदानावर आयपीएलचे सामनेही खेळवले गेले आहेत. मात्र गेल्या बऱ्याच महिन्यांपासून या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेलेला नाही.


हे ही वाचा – पवई तलाव ओव्हरफ्लो, तरीही मुंबईकरांची पाणी चिंता कायम!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -