Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा आता संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक, नीती आयोगाने केले सावध

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, "शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ही रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे.''

Third Wave : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपेक्षा आता संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक, निती आयोगाने केले सावध
Third Wave India witnessing higher spread of Covid-19 infection than second wave peak, says Govt official

भारतात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या एन्ट्रीनंतर ही रुग्णसंख्या तिपटीने वाढायला सुरुवात झाली आहे. यामुळे देशात ओमिक्रॉनबाधित रुग्णही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. ओमिक्रॉन डेल्टा व्हेरिएंट इतका धोकादायक नसला तरी याचा संसर्गाचा वेग सर्वाधिक आहे. त्यामुळे देशात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात केंद्र सरकारने कोरोनाबाबत एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. केंद्र सरकारने सांगितले की, देशातील आर व्हॅल्यू जे संक्रमण प्रसार दर्शवते की, कोरोनाची दुसरी लाट पीकवर असताना 1.69 होते ते आता 2.67 वर आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असण्याची शक्यता आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, “शहरांमध्ये कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ही रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी गर्दीवर नियंत्रण राखणे गरजेचे आहे.” असं ते म्हणाले.

“देशात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येचा सामना करावा लागतोय. ही रुग्ण वाढ देशाच्या पश्चिम भागात आणि मोठ्या शहरांमध्ये सर्वाधिक होतेय अशी माहिती उपलब्ध डेटामधून आली आहे.” असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी म्हटले.

“३० डिसेंबरला देशात कोरोना पॉझिटिव्ह रेट हा 1.1 टक्के होता तो दुसऱ्या दिवशी 1.3 टक्के झाला. यानंतर आता देशात हाच दर 5 टक्क्यांवर पोहचला आहे. तर 30 डिसेंबर रोजी 13 हजारांवर असणारी कोरोना रुग्णसंख्या मंगळवारी 4 जानेवारीला 58 हजारांवर पोहचली” असंही पॉल म्हणाले.

“त्यामुळे कोरोना ही वेगाने पसरणारी महामारी आहे. यात आर नॉट व्हॅल्यू ही आता 2.69 आहे. तर कोरोनाच्या दुसरी लाट पीकवर असताना हे केवळ 1.69 होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ही संख्या जास्त आहे. तसेच संक्रमणाचा वेगही सर्वाधिक आहे.” असंही पॉल म्हणाले.

‘मात्र दिलासाजनक बाब म्हणजे सध्याच्या घडीला रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या दिल्लीत रुग्ण भरती होण्याचं प्रमाण हे 3.7 टक्के आणि मुंबईत 5 टक्के आहे. तर 2020 आणि 2021 मध्ये कोरोना लाटेच्या सुरुवातीला हेच प्रमाण 20 टक्क्यांच्या जवळपास होते.


Family Pension : ‘या’ लोकांकडून हिरावून घेतला जाणार ‘फॅमिली पेन्शन’चा अधिकार, जाणून घ्या काय आहेत नियम!