Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर देश-विदेश Corona Pandemic: तीन आठवड्यांनंतर येणार कोरोनाची तिसरी लाट! ICMR चा इशारा

Corona Pandemic: तीन आठवड्यांनंतर येणार कोरोनाची तिसरी लाट! ICMR चा इशारा

Related Story

- Advertisement -

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर नियंत्रणात येत असून तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) मुख्य संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. समीरन पांडा यांनी असा अंदाज वर्तवला होती की, तिसरी लाट देशात येणार असली तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी तुलना करता या लाटेचा कहर काहीसा कमी असणार आहे. यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा नागरिकांना चेतावणी दिली आहे. ‘कोरोना महामारीची तिसरी लाट दोन-तीन आठवड्यांनंतर येऊ शकते. ही तिसरी लाटे येण्यामागे नागरिकांची गर्दीच जबाबदार असणार आहे.’ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करत असताना डॉ. समीरन पांडा म्हणाले की, ऑगस्टपासून देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

डॉ.पांडा यांनी गणिताच्या आधारे असे भाकीत केले की, येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये दररोजच्या घटनांमध्ये जवळपास ५० टक्क्यांची वाढ होऊ शकते. ऑगस्टमध्ये येणाऱ्या लाटेदरम्यान, दररोज एक लाखाहून अधिक बाधित रूग्णांची नोंद केली जाऊ शकते, असेही त्यांनी सांगितले. तसेच, दुसर्‍या लाटेच्या तुलनेत येणाऱ्या तिसऱ्या लाटेती तीव्रता खूपच कमी स्वरूपाची असणार आहे, कारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज साधारण चार लाख रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहता दररोज सरासरी ४० ते ४५ हजार रूग्ण नोंदविली जात आहेत. त्यानुसार, तिसऱ्या लाटेचा विचार करता या लाटेत कोरोनाच्या नव्या रूग्णांमध्ये ५० टक्के वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

- Advertisement -

तसेच डॉ. पांडा असेही म्हणाले, राज्यांमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन आणि विधानसभा हे दुसर्‍या लाटेचे प्रमुख कारण बनले होते. तर यावेळी लोकांचा निष्काळजीपणा, अनियंत्रित गर्दी आणि लसीकरण पूर्ण होण्यापूर्वी सर्व निर्बंधांमध्ये शिथिलता करणं हे तिसऱ्या लाटेची मुख्य कारणे बनू शकतात.यापूर्वी डॉ. व्हीके पॉल यांनीही असे सांगितले की, पुढील १०० ते १२५ दिवस देशासाठी सर्वात कठीण असणार आहेत, कारण या दिवसांत लसीकरण ५० ते ६० टक्क्यांपार जाणं आवश्यक आहे. यादरम्यानच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आणि ही लाट रोखणे देखील तितकंच आवश्यक आहे.


 

- Advertisement -