ही कंपनी काश्मीरमध्ये कारखाना उघडणार

आशिया खंडातील सर्वात मोठी हेल्मेट कंपनी स्टीलबर्ड हायटेकनेसुद्धा केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Jammu Kashmir Map

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील इतर राज्यातील जनतेचा जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करण्याला, व्यापार करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी हेल्मेट कंपनी स्टीलबर्ड हायटेकनेसुद्धा केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच कारखाना उघडण्याची इच्छा सुद्धा कंपनीने व्यक्त केली आहे.

हेही वाचा – पाकिस्तानमधील बॅनरवर झळकले संजय राऊत

काय म्हणाले स्टीलबर्ड हेल्मेट्सचे अध्यक्ष?

जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे देशभरातून स्वागत करण्यात येत आहे. स्टीलबर्ड कंपनीनेसुद्धा सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्टीलबर्ड हेल्मेट्सचे अध्यक्ष सुभाष कपूर म्हणाले की, ”केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे काश्मीर घाटीत नवीन औद्योगिक क्रांती सुरू होईल. या निर्णयामुळे काश्मीर घाटी देशाच्या मुख्य प्रवाहात येईल आणि आपल्या देशातील सामूहिक विकासाचा भाग बनेल.” ते पुढे म्हणाले की, ”सरकारच्या या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरमध्ये कारखाना सुरू करण्याची आमची इच्छा आहे. या ऑक्टोबरमध्ये गुंतवणूक संमेलन पार पडत असून या संमेलनातच कारखाना उभारण्याची योजना बनवत आहोत.” तसेच घाटीत कारखाना सुरू करताच आम्हाला मुक्तपणाने समान नियमांतर्गत काम करण्यासाठी मदत मिळेल,” अशी अपेक्षादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.