Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'ऐतिहासिक निर्णयांचं हे संसद अधिवेशन'; पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य

‘ऐतिहासिक निर्णयांचं हे संसद अधिवेशन’; पंतप्रधान मोदींचं सूचक वक्तव्य

Subscribe

हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यामुळे आता कोणते ऐतिहासिक निर्णय या अधिवेशन काळात घेतले जातील याकडे विरोधकांसह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आजपासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक अतिशय सूचक वक्तव्य केलं आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल, असं ते म्हणाले. त्यामुळे आता कोणते ऐतिहासिक निर्णय या अधिवेशन काळात घेतले जातील याकडे विरोधकांसह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. जेव्हापासून या अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती तेव्हापासूनच याबाबत अनेक तर्क- वितर्क लावले जात होते. त्यातच आता पंतप्रधान मोदींनी असं वक्तव्य केल्यानं आता चर्चा रंगल्या आहेत.  (This Convention of Historical Decisions Prime Minister Narendra Modi s very indicative statement)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान-3 आणि G-20 शिखर संमेलनाच्या यशाचा उल्लेख करताना भारताचं सामर्थ्य संपूर्ण जगाने पाहिल्याचं म्हटलं. पंतप्रधान म्हणाले की, मून मिशनचे यश… चांद्रयान-3, आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवीन प्रेरणा केंद्र बनलं आहे. या पॉईंटमुळे आपला ऊर अभिमानाने भरला आहे.

- Advertisement -

भारताला अभिमान वाटावा असे क्षण एकामागून एक आले आहेत. संपूर्ण देशात उत्सवाचं आणि उत्साहाचं वातावरण आपण अनुवभवत आहोतो. त्याचवेळी संसदेचं हे अधिवेशन होत आहे. हे सत्र लहान असलं तरी ते वेळेच्यादृष्टीने खूप मोठं आहे. हे अधिवेशन ऐतिहासिक निर्णयांचं असेल, असं मोदी म्हणाले.

असं असेल विशेष अधिवेशन

या अधिवेशनाची सुरुवात जुन्या संसद भवनात होणार आहे. दुसऱ्या दिवशी 19 सप्टेंबरला जुन्या संसद भवनातच फोटो सेशनचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता सेंट्रल हॉलमध्ये कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर खासदार नवीन संसद भवनात पोहोचतील. अधिवेशनाची बैठक 19 सप्टेंबरलाच नवीन इमारतीत होणार असून तिथे 20 सप्टेंबरपासून नियमित कामकाज सुरू होणार आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: महाराष्ट्र काश्मिरच्या मैत्रीचा नवा अध्याय; श्रीनगरमध्ये ‘ हम सब एक है’ विशेष कार्यक्रम )

- Advertisment -