Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश WHO ने धोकादायक सांगितलेल्या 'या' कफ सिरपची निर्मिती होते भारतात, वाचा...

WHO ने धोकादायक सांगितलेल्या ‘या’ कफ सिरपची निर्मिती होते भारतात, वाचा…

Subscribe

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने भारतात तयार होणारे एक कफ सिरप धोकादायक असल्याचे सांगितले आहे. मार्शल असे या धोकादायक कफ सिरपचे नाव असून हे भारतातील पंजाबमध्ये तयार करण्यात येते.

खोकला झाला की घरगुती आणि आयुर्वेदिक औषधे घेण्यापेक्षा लोक कफ सिरपच आधी घेताना दिसतात. अनेकदा तर लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खोकल्यासाठी कफ सिरप घेतात. पण नुकतेच WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने भारतात तयार होणारे एक कफ सिरप धोकादायक असल्याचे सांगितले आहे. मार्शल असे या धोकादायक कफ सिरपचे नाव असून हे भारतातील पंजाबमध्ये तयार करण्यात येते. मात्र, हे कफ सिरप म्हणजेच खोकल्याचे औषध निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेकडून 6 एप्रिलला देण्यात आला होता. पण हे कफ सिरप आता आयलंड आणि ओशनियामधील मायक्रोनेशियामध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पंजाबमधील QP फार्माकेम लिमिटेड या कंपनीमध्ये या सिरपची निर्मिती करण्यात येते. तर हरियाणातील ट्रीलियम फार्मा या औषधाची मार्केटिंग करते, अशी माहिती समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या थेरप्युटिक गुड्स अॅडमिनिस्ट्रेशन (TGA)च्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांद्वारे मार्शल कफ सिरपच्या ग्वायफेनेसिनच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – बंगालमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी नागरिक संतप्त, पोलीस स्टेशन पेटवले

या कफ सिरपचे विश्लेषण करण्यात आल्यानंतर याबाबत देण्यात आलेल्या अहवालात म्हंटले आहे की, दूषित पदार्थ डायथिलीन ग्लायकोल आणि उथिलीन ग्लायकोल हे मानवांसाठी विषारी आहेत. याचे सेवन केल्यावर हे प्राणघात ठरू शकतात. हे सिरप निकृष्ट दर्जाचे असून याचा वापर केल्यास विशेषत: मुलांना गंभीर आजार, किंवा त्यांचा मृत्यू होऊ शकतो. या कफ सिरपमुळे पोटात दुखणे, उलट्या होणे, अतिसार, लघवी करण्यास त्रास, डोकेदुखी, मानसिक स्थितीवर देखील परिणाम होऊ शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे WHO ने देखील या विश्लेषणात सांगण्यात आलेल्या माहितीला दुजोरा दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान, याआधी अनेकदा निकृष्ट औषधांमुळे जगभरातील अनेक लोकांचा निकृष्ट दर्जाच्या औषधामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर मागच्या वर्षी 2022 मध्ये इंडोनेशिया, गांबिया आणि उझबेकिस्तान या देशांमध्ये 300पेक्षा अधिक मुलांचा निकृष्ट औषधामुळे मृत्यू झाला होता. यामध्ये पाच वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांचा अधिक समावेश होता. या घटनेत मृत्यू झालेल्या बहुतांश मुलांचा तीव्र मूत्रपिंडाच्या दुखापतीमुळे मृत्यू झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

- Advertisment -