स्तनपान करणाऱ्या महिलांनी दूध अधिक यावे म्हणून आहारात घ्याव्येत हे पदार्थ

this foods to increase breast milk supply to moms

बाळासाठी आईचे दूध हे पूरक अन्नाप्रमाणे आहे. यामुळे जन्माला आल्यावर बाळाला सर्वात आधी आईचे दूध पाजले जाते. पण बऱ्याच महिलांना पुरेसे दूध येत नसल्याने बाळाला अर्धपोटी राहावे लागते. यामुळे बाळ भुकेने चिडचिडे होते. मात्र महिलेने जर आहारात काही घरगुती पदार्थांचा समावेश केला तर त्यांची या समस्येतून सुटका होऊ शकते आणि बाळाला पुरेसे दूध मिळू शकते.

ओवा- ओवा हा गुणकारी पदार्थ आहे. अपचन झाल्यावर किंवा पोटात गॅस झाल्यावर ओव्याचे सेवन केले जाते. पण दूध यावे यासाठीही स्तनदा मातांनी ओवा खाल्ल्यास फायदा होता. यासाठी दोन चमचा ओवा रात्रभर एक कप पाण्यात भिजवावा. सकाळी ते पाणी गाळून प्यावे.

जीरे- ओव्याप्रमाणेच जीऱ्याचे सेवन केल्यासही दूधाचे प्रमाण वाढते. पूर्वीच्या काळी घऱातील वयस्क महिला नव्यानेच आई झालेल्या महिलेला जेवणात भरपूर जीरे देत. त्यामागे पदार्थाला चव येण्याबरोबरच प्रसूती झालेल्या घरातील महिलेला दूध यावे हा देखील उद्देश असायचा.जीरे, गुळ आणि आले एकत्र शिजवून घ्यावे. त्यामुळे दूध वाढते.

ओवा आणि जिऱ्याप्रमाणेच बडीशोपही दूध वाढीसाठी उत्तम पदार्थ आहे. बडीशोपमुळे दूध वाढण्यास मदत तर होतेच शिवाय बद्धकोष्ठच्या समस्याही दूर होते.

मेथी-मेथीचे दाण्यामध्ये फायटोएस्ट्रोजनचा उत्तम स्त्रोत आहे. एक चमचा मेथीचे दाणे एक कप पाण्यात उकळून गाळून घ्यावे. नंतर कोमट झाल्यावर त्यात थोडसे मध टाकून दिवसातून तीनवेळा पिल्यास फरक पडतो.

बदाम- बदामामध्ये ओमेगा -३ फॅटी अॅसिड असते. त्यामुळे दूध वाढते. यामुळे डिलीव्हरीनंतर दूधात बदाम टाकून ते उकळून पिल्यास दूध वाढते.

डाळी-डाळींमध्ये भरपूर प्रोटीन्स आणि फायबर तसेच आयर्न मुबलक प्रमाणात असते. त्यातही हिरव्या मूगडाळ पचायला हलकी आणि पौष्टीक असते. यामुळे प्रसूती झालेल्या महिलेला आवर्जून डाळ खाण्यास देतात.

खजूर- खजूर खाल्ल्यानेही दूध वाढते. खजूरामध्ये प्रोलेक्टीन हार्मोन असते.यामुळे ब्रेस्ट मिल्क वाढण्यासाठी ८-१० खजूर रात्रभर दोन कप पाण्यात भिजवून ठेवाव्यात . सकाळी त्यातील बी काढून उरलेला गर एक ग्लास कोमट दूधात टाकून पिल्यास दूधाची समस्या दूर होते.


बनावट विवाह प्रमाणपत्राद्वारे कोट्यवधींची मालमत्ता हडप; खंडणीविरोधी पथकाकडून महिलेसह तिघांना अटक