Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर राजकारण कर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३ Karnataka : मुख्यमंत्रीपदावरून वातावरण तापणार? 'या' नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Karnataka : मुख्यमंत्रीपदावरून वातावरण तापणार? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

Subscribe

सिद्धरमय्या यांनी केलेल्या दाव्यावर टीका करत डी. के. शिवकुमार म्हणाले की, "धाडस असलेला व्यक्ती एकटा बहुमत निर्माण करु शकतो. मी एकटा म्हणजे बहुमत आहे. माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांचा निकाल (Karnataka Assembly Election Result) जाहीर होऊन दोन दिवस उलटून गेले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपचा काँग्रेसकडून दारूण पराभव करण्यात आला आहे. पण काँग्रेस (Congress) पक्षातील दिल्लीत बसलेल्या पक्षश्रेष्ठींसमोर एक नवे आव्हान उभे राहिले आहे. कर्नाटकात मुख्यमंत्री पदासाठी दोन नावे समोर आली आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार (D. K. Shivkumar) आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या नावाचा समावेश आहे. सिद्धरमय्या यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेतली. पण त्याआधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधून नवनिर्वाचित आमदारांनी त्यांच्याच नावाला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला असल्याचे सांगितले. पण त्यांच्या या दाव्यावर डी. के. शिवकुमार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – कर्नाटक आणि दिग्विजयाचे महाराष्ट्रातील आफ्टर शॉक…

- Advertisement -

सिद्धरमय्या यांनी केलेल्या दाव्यावर टीका करत डी. के. शिवकुमार म्हणाले की, “धाडस असलेला व्यक्ती एकटा बहुमत निर्माण करु शकतो. मी एकटा म्हणजे बहुमत आहे. माझ्या नेतृत्वात आज कर्नाटकात 135 आमदार निवडून आले आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना कर्नाटक जिंकून देण्याचं मी वचन दिलं होतं, ते मी पूर्ण केलं आहे. गेल्या पाच वर्षामध्ये काय काय झालं हे मी जाहीर करणार नाही. माझ्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी पूर्ण संख्या असून ती नेमकी किती हे आता सांगत नाही,” असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. डी. के. शिवकुमार यांनाही काँग्रेस हायकमांडने दिल्लीला बोलावले होते, पण तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी जाण्याचे टाळले असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

‘या’ नावाची घोषणा होण्याची शक्यता..
कर्नाटकात मुख्यमंत्र्याची निवड करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र सिंह आणि दीपक बाबरिया यांची निरीक्षक म्हणून निवड केली होती. या तिन्ही पर्यवेक्षकांना रविवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांशी स्वतंत्रपणे बोलून त्यांचे मत जाणून घ्यायचे होते. आमदारांची मतं जाणून घेण्यासाठी गुप्त मतदानही करण्यात आले आहे. हे तिन्ही निरीक्षक सोमवारी सायंकाळी खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी याबाबतचा अहवात खर्गे यांना दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बहुतांश नवनिर्वाचित आमदारांना सिद्धरमय्या यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती दिलेली असल्याने या पदावर सिद्धरमय्या यांची मुख्यमंत्री म्हणून तर डी. के. शिवकुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी घोषणा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

डी. के. शिवकुमार-सिद्धरमय्या यांच्यात होता वाद..
प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यामध्ये असलेले अनेक वर्षांपासूनचे शितयुद्ध हे सर्वश्रुत होते. या दोघांमधील वाद हा राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रेमध्ये’ संपुष्टात आला. मात्र त्याचा याठिकाणी थोडाफार का असेना पण परिणाम दिसून येत आहे. तर आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे नेहमीच या दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

येत्या एक-दोन दिवसांत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पदावर नेमके कोणाची वर्णी लागते. त्यानंतर पक्षात नाराजीचा सूर आवळला जातो का? असे एक ना अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत. पण काँग्रेस हायकमांडकडून कोणाच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -