काशी विश्वनाथाच्या मंदिरापासून काही अंतरावर आहे ‘हे’ स्वंयभू ज्योतिर्लिंग

हिंदू धर्मात देवी-देवतांना अत्यंत पूजनीय आणि पवित्र मानले जाते. प्रत्येक हिंदू महिना प्रत्येक देवाला समर्पित केला जातो. येत्या काही दिवसात श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात भगवान शंकरांची पूजा-आराधना केली जाते. श्रावणात अनेकजण भगवान शंकरांच्या विविध तिर्थ क्षेत्रांना भेट देतात. त्यांपैकीच एक म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर, काशी विश्वनाथ मंदिराला भारतातील तिर्थ क्षेत्रांपैकी मुख्य मानले जाते. याचं मंदिरापासून काही अंतरावर आणखी एक शिव मंदिर आहे. जिथे ज्योतिर्लिंग स्वयं प्रकट झालेले आहे. या ज्योतिर्लिंगाला १०८ ज्योतिर्लिंगापैंकी एक मानले जाते. काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या या मंदिरात अनेक भक्त दर्शनासाठी येतात. सुल्तानपूरमधील या प्राचीन मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या दर्शनासाठी वर्षभर लांबून भक्त येतात.

सुल्तानपूरमध्ये ४०० वर्ष जूनं मंदिर

काशी विश्वनाथ मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या सुल्तानपूरमधील हे मंदिर ४०० वर्ष जूनं मंदिर आहे. या मंदिराला भारतातील १०८ ज्योतिर्लिंगापैंकी एक मानले जाते. या मंदिरातील ज्योतिर्लिंग स्वंयभू आहे.असं सांगण्यात येतं की, या मंदिरात जो कोणी मनापासून अभिषेक आणि पूजा करतो, त्या व्यक्तीच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. त्यामुळेच इथे अनेकजण दर्शनासाठी येतात.

श्रावणात भाविकांची होते गर्दी
खरंतर, इथे पूर्ण वर्ष भक्तांची गर्दी असते. मात्र श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. श्रावणात लोक जलाभिषेक करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात.


हेही वाचा :Hindu Shastra : श्रावणात चुकूनही करू नका ‘या’ चुका; नाहीतर व्रताचे मिळणार नाही फळ