Eco friendly bappa Competition
घर गणेशोत्सव 2023 बंगळुरूच्या 'या' मंदिराने नाणी आणि नोटांचा वापर करत केली गणपतीची आरास

बंगळुरूच्या ‘या’ मंदिराने नाणी आणि नोटांचा वापर करत केली गणपतीची आरास

Subscribe

बंगळुरू : गणेशोत्सव हा सण फक्त महाराष्ट्रात साजरा केला जात नाही. तर देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यात कर्नाटकचे बंगळुरूमध्ये गणेश चतुर्थी ही धूमधामात साजरी केली जाते. बंगळुरूमध्ये नाणी आणि नोटाचा वापर करून मंदिर सजविले आहे.

बंगळुरू येथील जेपी नगरमधील श्री सत्य गणपती मंदिरने गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मंदिराला 10, 20, 50, 100,200 आणि 500 रुपयांच्या नाणी आणि नोटांचा वापर करून सजविले आहे. यासंदर्भात मंदिराचे ट्रस्टी मोहन राजू यांनी माहिती दिली की, गेल्या 11 वर्षापासून गणेशोत्सव काळात बंगळुरूमधील हे मंदिर वेगवेगळी सजावत करते. यंदा मंदिराने नाणी आणि नोटाने सजावट केली आहे. मंदिराच्या सजावटीसाठी एकूण 52.50 लाख नाणी आणि दोन कोटी सहा लाख नोटा रुपयांचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वी मंदिराच्या सजावटीसाठी फुले, कणिसांचे दाने आणि कच्च्या केळांचा वापर केला होता. बाप्पाचे उद्या आगमन होणार आहे. यानंतर पुढील 11 दिवस गणेशोत्सवाची धूम असणार आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

गणेशोत्सव काळात बाप्पाच्या वेगवेळी रुप पाहायला मिळतील. तसेच गेल्या सात ते आठ वर्षात इको-फ्रेंडली बाप्पाकडे लोकांचा कल वाढला आहे. त्याचबरोबर मुंबईच्या भायखळा येथील कळंबा चाळ गणेश मंडळाच्या मूर्ती ही धान्यांनी बनवलेली आहे. या बाप्पाच्या मूर्तीसाठी ज्वारी, बाजरी, नाचणी, कणीस या धान्यापासून बनविला आहे.

हेही वाचा – पावसातही खरेदीचा उत्साह; गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला

जीएसबी गणपतीचा कोट्यावधीचा विमा

किंग सर्कल येथील जीएसबी सेवा मंडळाचा गणपती सर्वात श्रीमंत गणपतींपैकी एक म्हणून ओळखला जातो. जीएसबीच्या गणेशोत्सवाचे यंदाचे 69वे वर्ष असून हा उत्सव पाच दिवसांचा असतो. या गणराजाचे दागिने जडजवाहिऱ्याचे असल्याने त्याची काळजी मंडळाकडून दरवर्षा घेतली जाते. भाविक आणि सेवेदारांनी आतापर्यंत या गजाननाला तब्बल 65 किलोंहून अधिक सोन्याचे दागिने आणि 295 किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. हे ध्यानी घेऊन जीएसबी मंडळाने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीकडून तब्बल 360 कोटी 40 लाख रुपयांचे विक्रमी विमाकवच घेतले आहे. यात भाविकांसह मंडप आणि स्टेडियमसाठी 30 कोटी रुपये, सोन्याचांदीच्या दागिन्यांसाठी 38.47 कोटी; आग, भूकंप, फर्निचर, सीसीटीव्ही, भांडी यासाठी 2 कोटी; स्वंयसेवक, स्वयंपाकी, सुरक्षारक्षक, स्टॉल कामगार, गाड्या, चप्पल यांच्यासाठी 289.50 कोटी, याशिवाय मंडप परिसरासाठी 43 लाख रुपयांचे विमाकवच घेण्यात आले आहे. गेल्यावर्षी 313 कोटींचा विमा मंडळाच्या वतीने काढण्यात आला होता.

 

- Advertisment -