यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाची झाली इतिहासात नोंद, ‘हे’ आहे कारण

rashtrapati murmu
नवी दिल्ली – आज भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन आहे. आजचा हा दिवस वेगळा आणि खास म्हणावा लागेल. कारण, भारताच्या इतिहासात आज पहिल्यांदाच आदिवासी समाजातील असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाच्या परंपरेनुसार कर्तव्य पथावर राष्ट्रपतींना परमवीर, अशोकचक्र विजेत्यांकडून सलामी देण्यात येते. आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सलामी देणअयात आली आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसंच, तिरंग्याला २१ तोफांची सलामीही देण्यात आली. १०५ मिमी भारतीय फील्ड गनने ही सलामी देण्यात आली. या फील्ड गनने जुन्या 25 पाउंडर गनची जागा घेतली, जी संरक्षण क्षेत्रातील वाढती ‘आत्मनिर्भरता’ दर्शवते.
यंदाच्या प्रजासत्ताक दिनी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातील कामगार आणि त्यांचे कुटुंबीय, कर्तव्यपथाचे देखभाल करणारे कामगार, भाजी विक्रेते, दूध बुथ कामगार, किराणा दुकानदार आणि रिक्षाचालक यांना विशेष निमंत्रण देण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांनी सादरीकरणादरम्यान याची माहिती दिली. गेल्या वर्षी राजपथचे नामकरण ‘कर्तव्य पथ’ करण्यात आल्यानंतर हा पहिला प्रजासत्ताक दिन सोहळा असेल.

यंदा पहिल्यांदाच परेडमध्ये अग्निविरांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच, अनेक राज्यांच्या चित्र रथांमधून नारी शक्तीचीच झलक पाहायला मिळाली आहे.