घरताज्या घडामोडीज्या लोकांना भारतात भीती वाटतेय त्यांनी अफगाणिस्तानात जा, तिथे पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे...

ज्या लोकांना भारतात भीती वाटतेय त्यांनी अफगाणिस्तानात जा, तिथे पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे – भाजप आमदार

Subscribe

अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवला आहे. याबाबत भारतामध्ये सध्या वादग्रस्त विधान केले जात आहे. समाजवादी पार्टीचे खासदार डॉ. शफीकुर्रहमान बर्क यांनी तालिबानला समर्थन करत विधान केले होते. ज्यामुळे वाद सुरू झाला आणि याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. यानंतर आता भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी अशाप्रकारे वादग्रस्त विधान केले आहे. ज्यानंतर अनेक जण त्यांच्यावर टीका करत आहेत.

बिहारचे भाजप आमदार हरिभूषण ठाकूर म्हणाले की, ‘अफगाणिस्तानच्या परिस्थितीचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु ज्या लोकांना भारतात भीती वाटतेय त्यांनी अफगाणिस्तानात जा, तिथे पेट्रोल-डिझेल स्वस्त आहे. तालिबानाची ही स्वातंत्र्यासाठीची लढाई आहे. अफगाण नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी तालिबान लढत आहेत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेचे राज्य आहे? तालिबान अफगाणिस्तानमधली एक शक्ती आहे आणि अफगाण नागरिकांना त्यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्य हवे आहे.’ हरिभूषण ठाकूर यांच्या या विधानावरून बऱ्याच जणांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबतचे वृत्त एका हिंदी वेबसाईटने दिले आहे.

- Advertisement -

यापूर्वी जेडीयू नेते गुलाम रसूल बलियावी यांनी सर्व धर्मातील लोकांना भारतात आणण्याचा विधानावर त्यांना विचारले होते तेव्हा ते म्हणाले होते की, धर्माच्या नावावर देश विभागला जात आहे, हे लोकं पुन्हा विभाजित होतील. जर भारताची लोकं सांभाळले नाहीतर भारत पण अफगाणिस्तान आणि तालिबान होवू शकतो. लोकं समजत नाही आहेत आणि फक्त मताच्या चष्माने बघत आहे. पण भारतीयांनी आता अफगाणिस्तानला पाहावे आणि त्यांच्याकडून शिकावे असे आवाहन त्यांनी केले आहे.


हेही वाचा – एक जोडी कपड्यावर सोडला देश, परतीचा मार्ग शोधतोय, अशरफ घनींची भावनिक पोस्ट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -