घरक्राइम100 रुपयांच्या पेटीएमने पकडले 4 कोटींचे दागिने लुटणारे चोर; दिल्लीतील धक्कादायक घटना

100 रुपयांच्या पेटीएमने पकडले 4 कोटींचे दागिने लुटणारे चोर; दिल्लीतील धक्कादायक घटना

Subscribe

4 कोटींचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पेटीएमवरून 100 रुपये पाठवून शोध घेत, अटक केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत बुधवारी पहाटे साडेचार वाजता कुरिअर कंपनीच्या कार्यालयाबाहेर दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी 4 कोटी रुपयांचे दागिने लुटले.

4 कोटींचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांना पेटीएमवरून 100 रुपये पाठवून शोध घेत, अटक केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत बुधवारी पहाटे साडेचार वाजता कुरिअर कंपनीच्या कार्यालयाबाहेर दरोडा टाकल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी 4 कोटी रुपयांचे दागिने लुटले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. (those who robbed jewelery worth rs 4 crore did pay tm rs 100 and were caught)

दिल्लीत बुधवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास कुरिअर कंपनीच्या कार्यालयाबाहेर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी 4 कोटी रुपयांचे दागिने लुटले. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कुरिअर कंपनीत काम करणारी दोन मुले दागिने घेऊन चंदीगडला जात होती. यादरम्यान ४-५ जण तेथे आले. त्यापैकी एक पोलिसांच्या गणवेशात होता.

- Advertisement -

दरोडेखोरांनी दोन्ही मुलांवर प्राणघातक हल्ला करून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दागिने हिसकावून पळ काढला. त्यानंतर सीसीटीव्हीवरून एका आरोपीची ओळख पटली. घटनेपूर्वी एका आरोपीने कॅब चालकाला 100 रुपये रोख आणि 100 रुपये पेटीएम दिले होते. त्यानंतर चहा विक्रेत्याला 100 रुपये दिले.

कॅब चालकाची चौकशी केल्यानंतर आरोपीचा मोबाईल क्रमांक सापडला. यानंतर जयपूर येथून तीन आरोपींना पकडण्यात आले. दिल्ली पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. लुटलेले दागिने जप्त करण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा – हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवा, दसरा मेळाव्यासाठी मनसैनिकांची राज ठाकरेंना साद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -