घरदेश-विदेशCovishield पुढे कोरोनाची हार! दोन्ही डोस घेतलेल्यांना ९३ टक्क्यांनी कमी संसर्गाचा धोका

Covishield पुढे कोरोनाची हार! दोन्ही डोस घेतलेल्यांना ९३ टक्क्यांनी कमी संसर्गाचा धोका

Subscribe

भारतात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरतेय. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतेय. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून कोरोनाची लस सर्वाधिक लोकांनी घ्यावी, असे आवाहन देखील केलं जात आहे. भारतात सध्या कोरोनाच्या कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुटनिक व्ही या लसी लोकांना दिल्या जात आहे. कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींना कमी संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. या लसींपैकी ‘कोव्हिशिल्ड’ अधिक प्रभावी ठरली असून त्यापुढे कोरोनाने देखील हार मानल्याचे समोर आले आहे. नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातून असे स्पष्ट झाले की, ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संसर्गाचा धोका तब्बल ९३ टक्क्यांनी कमी होतो, देशात लसीकरणानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ १.६ टक्के आहे. म्हणजेच दोन्ही डोस घेतलेल्या एक हजार लोकांपैकी १६ जणांनाच पुन्हा कोरोनाची बाधा होऊ शकते.

करण्यात आलेल्या य़ा सर्वेक्षणात देशाच्या सशस्त्र बलांतील १५ लाख ९५ हजार ६३० आरोग्यसेवक व प्रंटलाइन वर्कर्स सहभाग होता. यावेळी देशाच्या कोरोना लसीकरण मोहिमेतील प्रमुख कोव्हिशिल्ड लसीची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. या लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर केवळ ७ टक्के संसर्गाचा धोका असल्याचे समोर आले आहे. यासोबतच चंदिगडच्या ‘पीजीआय’ने यासंदर्भातील अभ्यास केला असून हे जगातील सर्वात मोठे सर्वेक्षण आहे, असा संशोधकांचा दावा आहे. यातील निष्कर्ष ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा व्हेरिएंटने कहर केला होता. त्यादरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले होते, असे ‘निती’ आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले. १३५ दिवस सुरू असलेल्या या सर्वेक्षणातील निष्कर्षांनी लसीबाबत संभ्रम असलेल्या लोकांच्या मनातील शंका दूर केल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या सर्वेक्षणात सहभागी लोकांपैकी लस न घेतलेल्या १० हजार ६१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला, तर लसीचा एक डोस घेतलेल्या १,१५९ आणि दोन डोस घेतलेल्या २,५१२ लोकांना संसर्ग झाला. याबरोबर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाणही लस न घेतलेल्या लोकांमध्ये अधिक आढळले. लस न घेतलेल्या ३७ लोकांचा मृत्यू झाला, तर एक डोस घेतलेल्या १६ जणांना आणि दोन डोस घेतलेल्या ७ जणांना कोरोनाशी झुंज देताना जीव गमवावा लागला.


Tokyo Olympics 2020: अजी सोनियाचा दिनू!
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -