Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ...तरी मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे, ठाकरे गटाला विश्वास

…तरी मोदी-शहांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे, ठाकरे गटाला विश्वास

Subscribe

मुंबई : ‘इंडिया’ आघाडीने देशाचे वातावरण ढवळून काढले आहे. जनता जागी झाली आहे व कोणत्याही भूलथापांना ती बळी पडणार नाही. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणतात त्याप्रमाणे भाजपाने देशातील सर्व विमाने, हेलिकॉप्टर्स प्रचारासाठी बुक केली आहेत. त्यांना हवे ते करू द्या. त्यांनी ‘चांद्रयान 3’ आणून त्यावर स्वार होऊन प्रचार केला तरी त्यांच्या हुकूमशाहीचा पराभव अटळ आहे, असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Pritam Munde : ‘हे’ पद आयुष्यभर राहणार…, खासदार प्रीतम मुंडे झाल्या भावूक

- Advertisement -

हरण्याच्या भीतीने निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असा नवा ‘अ-लोकतांत्रिक’ पायंडा भाजपा व त्यांच्या फुटीर महामंडळींनी पाडलेला दिसतो. पण लोकसभा निवडणुका मात्र वेळेच्या आधीच, म्हणजे डिसेंबर महिन्यातच घेतल्या जातील, असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत देशभरातील सर्व हेलिकॉप्टर्स बुक करण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक प्रचारासाठी कोणतीच वेगवान साधने विरोधकांना मिळू नयेत यासाठी सुरू असलेला सत्तेचा हा गैरप्रकार निषेधार्ह आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

हेही वाचा – जेव्हा मतं कमी होऊ लागतात तेव्हाच भेटवस्तू वाटल्या जातात; कॉंग्रेसचा मोदींना टोला

त्यांच्या सत्तायोगाची हवा गेली

- Advertisement -

निवडणुका 2024 ला करा नाहीतर 2023 अखेरीस करा, मोदी-शहांच्या कुंडलीत राजयोग नाही व चोऱ्यामाऱ्या करून असे काही करण्याचा प्रयोग केलाच तर ते सर्व प्रकरण त्यांच्यावरच उलटेल. भाजपाची हुकूमशाही कोणत्याही परिस्थितीत सत्तेतून पायउतार होणार आहे हे नक्की. त्यांच्या कुंडलीतल्या ओढूनताणून आणलेल्या सत्तायोगाची हवा गेली आहे. त्यांना राजयोग नव्हताच. ओढून-चोरून आणलेला सत्तायोग होता. तो आता संपल्यात जमा आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार

भगवान विष्णूने आपला भक्त प्रल्हादास दैत्य हिरण्यकश्यपूपासून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेतला. दैत्य हिरण्यकश्यपूचा अंत नरसिंहाने ज्या भयंकर पद्धतीने केला तीच गत जगभरातील सर्वच हुकूमशहांची झाली. एक तर हुकूमशहांना देश सोडून पळून जावे लागले किंवा खवळलेल्या जनतेने त्यांच्या प्रासादात घुसून त्यांचा खात्मा केला. कारण लोकशाहीत जनता हीच नरसिंहाचा अवतार आहे. त्यामुळे 2024 असो की 2023, निवडणुका कधीही घ्या, हुकूमशाहीरूपी हिरण्यकश्यपूचा अंत हा ठरलेला आहे, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

- Advertisment -