घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटखळबळजनक! अमेरिकेत हजारो लोकांना दिला फायझर लसीचा चुकीचा डोस!

खळबळजनक! अमेरिकेत हजारो लोकांना दिला फायझर लसीचा चुकीचा डोस!

Subscribe

जगभरातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे. पण यादरम्यान अमेरिकेत खळबळजनक घटना घडली आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये कोरोना लसीचे चुकीचे डोस दिल्याचे समोर आले आहे. माध्यमांच्या माहितीनुसार, हजारो लोकांना फायझरच्या कोरोना लसीचा डोस गरजेपेक्षा कमी दिला आहे. १ मार्चला ऑकलँडच्या लसीकरण केंद्रावर हजारो लोकं पोहोचले होते. दरम्यान चुकीच्या डोस देण्याचा एवढाच मुद्दा नसून लोकांनी लसीकरण केंद्रावर सिरिंज कमी असल्याची तक्रार केली आहे. यामुळे अनेकांना कोरोना लस मिळू शकली नाही आहे. त्यामुळे सध्या अमेरिकेत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे.

लसीकरण केंद्रावर कोरोना लसीचा दिला चुकीचा डोस

दोन अज्ञात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार माध्यमांनी हे वृत्त दिले आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, फायझरच्या लसीचा निर्धारित डोस ०.३ml दिला पाहिजे, परंतु कॅलिफोर्नियाच्या लसीकरण केंद्रावर पोहोचलेल्या ४३ हजार लोकांना फायझरच्या लसीचे मात्र ०.२ml डोस दिला गेला आहे. तसेच सिरिंजची समस्या असल्यामुळे कोरोना लसीचा डोस खूप कमी लोकांना मिळाला असल्याचे देखील समोर आले आहे. याबाबत राज्याच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना माहिती दिली की, चुकीच्या पद्धतीने केलेल्या लसीकरणाचा प्रकाराचा १ मार्चला सकाळी उघडकीस आला. परंतु २ वाजेपर्यंत त्या लोकांची ओळख पटविण्यात आली.

- Advertisement -

कॅलिफोर्निया ऑफिस ऑफ इमरजेंसी सर्व्हिसेस आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी या दोन्ही लसीकरण केंद्र चालवणाऱ्यांना या घटनेबाबत माहित नव्हते. मंगळवारी माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्या एजन्सींना माहिती मिळाली. त्यानंतर राज्याचे आरोग्य विभाग, अमेरिकाचे आरोग्य आणि मानस सेवा शिवाय फायझनने मंगळवारी लसीकरणाच्या चुकांबद्दल चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती.


हेही वाचा – Corona Vaccine: कोरोना लसीचा महिलांवर होतोय सर्वाधिक साईड इफेक्ट

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -