Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्रात ११ पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले करण्यासाठी सक्रीय

Related Story

- Advertisement -

सीआरपीएफच्या (CRPF) मुंबई मुख्यालयाला धमक्यांचे मेल आल्यामुळे राज्याच्या सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. सीआरपीएफला आलेल्या धमक्यांच्या मेलमध्ये राज्यातील सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे, विमानतळे आणि मल्टिप्लेक्स निशाण्यावर असून बॉम्ब हल्ला करण्याची धमकी दिली आहे. माहितीनुसार हे मेल चार ते पाच दिवसांपूर्वी आले आहे. महत्त्वाचे म्हणजे गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे या धमक्यांच्या मेलमधून समोर आले आहे. याबाबतची माहिती सीआरपीएफच्या सुत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

- Advertisement -

सीआरपीफला आलेल्या या धमक्याचे मेल पुढील तपासाठी एनआयएसह राज्यात इतर सुरक्षा एजन्सीकडे पाठवण्यात आले आहेत. माहितीनुसार, मेलमध्ये भारतात लपलेल्या लष्कर ए तोयब्बाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच तीन राज्यांमध्ये २०० किलो हाय ग्रेड आरडीएक्स पोहोचवण्यात आल्याची माहिती देखील मेलमध्ये देण्यात आली आहे.

धमक्यांच्या या मेलमध्ये सांगितले की, महाराष्ट्रात ११ पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले करण्यासाठी Active आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचे मेलमधून समोर आले आहे.

- Advertisement -

मेलच्या शेवटी असे लिहिले आहे की, ‘आम्ही अज्ञात आहोत. आम्ही एक आर्मी आहोत. आम्ही क्षमा करत नाही. आम्ही विसरत नाही. आमची वाट पाहा.’ अशा प्रकारे धमक्यांचे मेल आल्यामुळे राज्यातील एजन्सी पूर्णपणे मेलचे सोर्स आणि मेल करणाऱ्या मागचा कटचा तपास करत आहेत.


हेही वाचा – जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, नक्षलवादविरोधी संघर्ष अधिक तीव्र होणार- अमित शहा


 

- Advertisement -