घरक्राइमRSS प्रमुखांना 'राष्ट्रपित्या'ची उपमा; इमाम प्रमुखांना शिरच्छेदाची धमकी

RSS प्रमुखांना ‘राष्ट्रपित्या’ची उपमा; इमाम प्रमुखांना शिरच्छेदाची धमकी

Subscribe

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांना ‘राष्ट्रपित्या’ची उपमा दिल्याने ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांना आता शिरच्छेदाची धमकी दिली जात आहे. इमाम यांनी काही दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना राष्ट्रपिता म्हटले होते. यानंतर 23 सप्टेंबरपासून इंग्लंड, पाकिस्तानसह भारतातील अनेक भागांतून शेकडो फोन कॉल्सद्वारे त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. याप्रकरणी त्यांनी दिल्लीच्या टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

22 सप्टेंबर रोजी आरएसएस प्रमुख मोहन भागवत, सहसरकार्यवाह डॉ. कृष्णा गोपील, अखिल भारतीय संपर्क प्रमुख रामलाल आणि ज्येष्ठ प्रचारक इंद्रेश कुमार यांनी इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. त्या दिवसापासून इमाम उमर अहमद इलियासी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. या घटनेपासून सुरक्षेच्या कारणास्तव इमाम यांचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. यावर इमाम यांनीही आपण अशा धमक्यांना घाबरणार नाही किंवा झुकणार नाही असं ठणकावून सांगितले आहे. इमाम पुढे म्हणाले की, देशात सद्भावना वाढवण्यासाठी मी काम करत राहणार आहे. तसेच आरएसएस प्रमुखांबाबत केलेले विधान मागे घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

बडा हिंदुराव मदरशात जाऊन मोहन भागवत आणि इलियासी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेनच्या प्रमुखांनी संघ प्रमुखांच्या या उपक्रमाचे वर्णय धार्मिक सलोख्याच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले. तसेच मोहन भागवतांना राष्ट्रपिता आणि राष्ट्रऋषी अशी उपमा दिली. तसेच भागवत हे प्रचारक आहेत, त्यांनी संपूर्ण आयुष्य देश आणि समाजसेवेसाठी समर्पित केले म्हणूनच ते राष्ट्रपिता आहेत, असेही इलियासी म्हणाले.

यावेळी इमाम यांनी पीएफआयवरील बंदीचे देखील समर्थन केले. दरम्यान इलियासी यांनी मोहन भागवतांबाबत केलेले वक्तव्य देखील काही राजकारणी आणि कट्टरवाद्यांना आवडले नाही, त्यामुळे त्यांनी धमक्या येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इलियासी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, संघ प्रमुखांना भेटल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर भारतातील अनेर राज्ये आणि विविध देशांतून धमक्यांचे फोन येत आहेत. यावेळी सर तन से जुदा करण्याच्या धमक्या त्यांना मिळत आहेत. याप्रकरणी इलियासी यांनी 24 सप्टेंबर रोजी टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी गृहसचिव आणि दिल्ली पोलीस आयुक्तांनाही त्यांनी माहिती दिली आहे. पीएफआयवरील बंदीचे समर्थन केल्याने कट्टरवाद्यांकडून त्यांना लक्ष्य केल जात असल्याचे म्हटले जातेय.


रिटायरमेंट प्लॅनिंगबाबतीत बहुतांश भारतीय मागे; अहवालातून माहिती समोर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -