घरदेश-विदेशSidhu Moosewala Death प्रकरणी आत्तापर्यंत तीन गुंडांना अटक, नेमके आरोप काय?

Sidhu Moosewala Death प्रकरणी आत्तापर्यंत तीन गुंडांना अटक, नेमके आरोप काय?

Subscribe

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक उत्तराखंडच्या देहराडूनमधून झाली.

पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरु आहे. या हत्याकांडाप्रकरणी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस रिमांडवर ज्या तीन जणांची चौकशी करत आहेत त्यापैकी एकाचे नाव मनप्रीत आहे तर दुसऱ्याचे नाव शरद असे आहे. (Sidhu Moose Wala Death)

सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी पहिली अटक उत्तराखंडच्या देहराडूनमधून झाली. याठिकाणाहून पोलिसांनी मनप्रीत उर्फ भाऊ नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली. मनप्रीतवर हल्लेखोरांना बोलेरो आणि कोरोला वाहनं पुरवल्याचा आरोप आहे, दरम्यान आरोपीविरोधात गुन्हेगारी रेकॉर्डही सापडले आहेत. (Sidhu Moose Wala Dead)

- Advertisement -

यानंतर भटिंडा आणि फिरोजपूर कारागृहात कैदी असलेल्या दोन गुडांना (मनप्रीत सिंग उर्फ ​मन्नू आणि शरद) 5 दिवसांच्या प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात आले आहे. दोघेही लॉरेन्स बिश्नोई गँगचे शार्प शूटर आणि सक्रिय सदस्य आहेत. (Gangster Lawrence Bishnoi)

मनप्रीत सिंग उर्फ ​मन्नू आणि शरद यांच्याबद्दल असे बोलले जात आहे की ते दोघेही कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रारच्या व्हर्च्युअल नंबरद्वारे संपर्कात होते. दरम्यान मूसेवाला हत्येप्रकरणी वाहन पुरवणाऱ्या भाऊवर अनेक गुन्हे दाखल आहेत. भाऊवर फरीदकोट, मुक्तसर आणि इतर जिल्ह्यांमध्ये 9 गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

दरम्यान तिहार तुरुंगात तसेच पंजाबच्या तुरुंगातून मूसेवालाच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूसेवाला याच्या हत्येत एकूण 6 शूटर्सचा सहभाग होता. याआधीही सिद्धूचे मारेकरी दोन वाहनांमधून आले होते. एक कार (बुलेरो) सोडून त्यांनी पळ काढला, या कारवर बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती.

सिद्धू मूसेवाला याच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या मानसा गावात यावेळी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. हत्येच्या आदल्या दिवशी त्याने स्वतः नांगरलेल्या शेतातच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


Sidhu Moose Wala murder: सिद्धू मूसेवालाच्या हत्याकांडातील आरोपींचे सलमान खानशी कनेक्शन


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -