घरदेश-विदेशजम्मू काश्मीर : लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद

जम्मू काश्मीर : लष्कराच्या ताफ्यावर हल्ला; १ जवान शहीद

Subscribe

जम्मू–काश्मीर येथील अखनूर सेक्टरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात १ जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू–काश्मीरच्या सीमा भागामध्ये दहशतवाद्यांच्या खुरापती सुरु असताना आज पुन्हा एकदा लष्कराच्या ताफ्यावर दहशवादी हल्ला करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यामुळे झालेल्या स्फोटात एक जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाले आहेत. जम्मू–काश्मीर येथील अखनूर सेक्टरमध्ये ही घटना घडली आहे.

- Advertisement -

लष्कराच्या ताफ्यावर हल्ला

जम्मू–काश्मीर येथील अखनूर येथून जवानांची एक तुकडी लष्कराच्या ट्रकमधून प्रवास करीत असताना स्फोट झाला, असे वृत्त एएनआयने लष्करी सुत्र्यांच्या हवाल्याने दिले आहे. दरम्यान, या भीषण स्फोटात तीन जवान गंभीररित्या जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या उपचारा दरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू काश्मीरच्या पलांवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटके पेरण्यात आली होती. दरम्यान, लष्कराचा ट्रक या स्फोटकांच्या संपर्कात आल्याने त्याचा स्फोट झाला आणि दुर्घटना घडली, असे माध्यमांतील वृत्तांमधून सांगण्यात येत आहे.


हेही वाचा – मार्च अखेरपर्यंत एअर इंडिया, भारत पेट्रोलियम विकणार : अर्थमंत्री

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -