काँग्रेसच्या तीन बड्या प्रवक्त्यांची पक्षाला सोडचिठ्ठी; अध्यक्षपदाचे उमेदवार करणार खरगेंचा प्रचार

three big spokespersons of congress resigned presidential cadidate kharge will campaign

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक आता चांगलेच रंग भरले जात आहेत. या निवडणुकीसाठी पक्षाकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. यात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेवेळी खरगे यांच्यासोबत दीपेंद्र हुडा, गौरव बल्लभ आणि नासिर हुसेन अनेक नेते उपस्थित होते. याचवेळी खरगे यांनी काँग्रेसच्या तीन बड्या प्रवक्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याची माहिती दिली. आता हे तिनही प्रवक्ते काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिंगणात असणारे उमेदवार मल्लिकार्जुन खरगे यांचा प्रचार करतना दिसणार आहेत.

राजीनाम देणारे पक्षाचे प्रवक्ते गौरव बल्लभ यावेळी म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या सुचनेनुसार आम्ही पक्षाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला असून खरगे यांच्या प्रचारासाठी पुढे काम करणार आहोत. यानंतर आता काँग्रेसने अधिकृतपणे मल्लिकार्जुन खरगे यांना पाठिंबा दिला आहे.

यावेळी पत्रकार परिषदेत खरगे म्हणाले की, कठोर संघर्षानंतर मी इथपर्यंत पोहचलो आहे. मी कुठेही गेलो तरी तिथे पूर्णवेळ काम करण्याची माझी सवय आहे. पक्षातील बदलांवरून करण्यात आलेल्या टार्गेटवर खरगे म्हणाले की, त्यांच्या मनात विचार असू शकतात. याबाबत 9,300 प्रतिनिधी निर्णय घेतील, ही घरची बाब आहे. मी एकटा निर्णय घेणार नाही. समितीमधील सर्वजण मिळून निर्णय घेतील.

मल्लिकार्जुन खरगे पुढे म्हणाले की, गांधी परिवाराने या देशासाठी बलिदान दिले आहे. दहा वर्षे काँग्रेस सरकारमध्ये असलेल्या सोनिया गांधींनी पंतप्रधान होण्याचा कधी प्रयत्न केला नाही,की राहुल गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रयत्न केला नाहीय. आजही राहुल गांधी भर उन्हात भारत जोडो यात्रा करत आहेत. त्यांच्याशी आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी मी नक्कीच चर्चा करेन असही खरगे म्हणाले.


मुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचल्याची खोटी माहिती देणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल