Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रातील तीन मच्छीमार

लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिनाच्या विशेष निमंत्रितांमध्ये महाराष्ट्रातील तीन मच्छीमार

Subscribe

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षकांना मान्यवर विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे.

नवी दिल्ली : लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशवासीयांना संबोधित करण्याची परंपरा असून, या आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रात नावाजलेल्या विविध मान्यवरांना निमंत्रित केले जाते. यावर्षी तब्बल 1800 जण विशेष मानकरी असून, यामध्ये महाराष्ट्रातील तीन मच्छीमारांचा समावेश आहे. या निमंत्रणामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.

ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 77 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षकांना मान्यवर विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने देशातील 50 खादी कारागीर आणि 18 विविध क्षेत्रामधील 65 कारागिरांना त्यांच्या सहचरी, सहचरणीसह स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. यासोबच या विशेष निमंत्रितांमध्ये व्हायब्रंट व्हिलेजेसचे सरपंच, शिक्षक, परिचारिका, शेतकरी, मच्छीमार तसेच सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, अमृत सरोवर, हर घर जल या आणि अशाच इतर महत्वाच्या सरकारी उपक्रमात काम करणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Independence Day 2023 : मुंबई अग्निशमन दलातील 5 अधिकाऱ्यांनी कोरले राष्ट्रपती पदकावर नाव

50 मच्छीमारांना विशेष निमंत्रण

देशाचा स्वातंत्र्यदिन म्हणजे सगळ्यांसाठीच अभिमानाचा दिवस. याच दिवशी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या ऐतिहासिक कार्यक्रमांचे साक्षीदार होण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते. यामुळेच उद्याच्या कार्यक्रमासाठी देशभरातील 50 मच्छीमारांना निमंत्रित केले असून, त्यामध्ये 3 मच्छीमार हे महाराष्ट्रातील आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : ‘भाजपकडून सत्तेचा गैरवापर’, शरद पवारांची टीका

हे तीन मच्छीमार राहणार उपस्थित

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील तीन मच्छीमारांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नेवपूरचे तुकाराम वानखेडे, तर दुसरे आहेत पालघर जिल्ह्यातील राजेंद्र शांताराम मेहेर आणि तिसरे आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील अक्षय ऊईके या तीन मच्छीरामांना विशेष निमंत्रण मिळाले असून, ते उद्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -