Maharashtra Assembly Election 2024
घरदेश-विदेशHindu In Bangladesh : बांगलादेशात हिंदू असुरक्षितच; तीन मंदिरांची केली तोडफोड

Hindu In Bangladesh : बांगलादेशात हिंदू असुरक्षितच; तीन मंदिरांची केली तोडफोड

Subscribe

बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली दिसते आहे. तेथील हिंदू समाजाला वारंवार काही न काही अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागते आहे.

ढाका : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाजाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललेली दिसते आहे. तेथील हिंदू समाजाला वारंवार काही न काही अन्याय, अत्याचाराला सामोरे जावे लागते आहे. आता तर चटगाव येथील हिंदू मंदिरांवर तेथील लोकांनी हल्ला केला. (three hindu temples vandalized by mob in bangladesh chattogram crime against hindu people)

चटगाव येथे निदर्शने करणाऱ्या जमावाने अचानक तीन हिंदू मंदिरांवर हल्ला केला. इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याविरोधात देशात निदर्शने आणि हिंसाचार सुरू आहे. त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maha Government : अखेर महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित

चटगाव येथील हरीश चंद्र मुनसेफ लेन येथे शुक्रवारी दुपारी जवळपास 2.30 च्या सुमारास या जमावाने शांतनेश्वरी मातृ मंदिर, शोनी मंदिर आणि शांतनेश्वरी कालीबाडी मंदिरावर हल्ला केला.

- Advertisement -

BDNews24.com ने दिलेल्या वृत्तानुसार, घोषणाबाजी करणाऱ्या शेकडो लोकांनी मंदिरांवर दगड – विटा फेकल्या. यामुळे शोनी मंदिर आणि अन्य दोन मंदिरांच्या प्रवेशद्वाराचे नुकसान झाले.

पोलीस ठाण्याचे प्रमुख अब्दुल करीम यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मंदिरांचे नुकसान झाल्याचे त्यांनी मान्य केले. दोन्ही समाजांनी परस्परांवर दगड – विटा फेकल्याचे त्यांनी सांगितले.

शांतिनेश्वरी मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य तपन दास म्हणाले की, शुक्रवारच्या नमाजानंतर शेकडो लोकांचा जमाव चालून आला. जमावाने हिंदू विरोधी आणि इस्कॉन विरोधी घोषणा देण्यास सुरुवात केली. आम्ही आमच्याकडून कसलीही हालचाल केली नाही. पण जेव्हा परिस्थिती अधिकच बिघडली तेव्हा आम्ही लष्कराला बोलावले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनीही तातडीने येत परिस्थिती नियंत्रणात आणली. दुपारीच मंदिरांची दारं बंद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – Politics : …म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी सांगितलं कारण

इस्कॉनचे माजी सदस्य आणि हिंदू नेता चिन्मय कृष्ण दास यांना सोमवारी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. मंगळवारी त्यांनी जामीन देण्यास नकार देण्यात आला. त्यानंतर ढाका आणि चटगावसह बांगलादेशातील विविध ठिकाणी हिंदू समाज निदर्शने करत आहे. (three hindu temples vandalized by mob in bangladesh chattogram crime against hindu people)


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -