Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी UNच्या सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत भारतातील तीन गावांचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्ये

UNच्या सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत भारतातील तीन गावांचा समावेश, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Related Story

- Advertisement -

संयुक्त राष्ट्राच्या (UN) सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत भारतातील तीन गावांची नोंद झाली आहे. मेघालयचे कोंगथोंग गाव संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या (UNWTO)पुरस्कारसाठी सर्वोत्तम पर्यटन गावाच्या विभागात नॉमिनेट झाले आहे. या यादीत भारताचे अजून दोन गावं सामील आहेत. ज्यामध्ये मध्य प्रदेशचे लधपूर खास आणि तेलंगणाचे पोचमपल्ली गाव याचेही नाव सामील झाले आहे. पर्यटन स्थळाच्या दृष्टीने ही गावे पर्यटकांना खूप आवडतात.

याबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, मध्य प्रदेशचे लधपूर खास गावाची सर्वात्तम पर्यटन गावात एंट्री होणे ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. यासाठी मध्यप्रदेशच्या पर्यटन आणि प्रशासनाच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा. अशाप्रकारे चांगले काम करत राहा.

- Advertisement -

लधपूर खास गाव मध्य प्रदेशमधील टीकमगढ जिल्ह्यातील ओरछा तालुक्यातील आहे. पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख सचिव शेखर शुक्ला याबाबत अधिक माहिती देत म्हणाले की, राज्याच्या ‘ग्रामीण पर्यटन प्रकल्प’ अंतर्गत, पुढील पाच वर्षांत १०० गावांचा विकास केला जाईल.

- Advertisement -

सर्वात्तम पर्यटन गावातील कोंगथोंग गावाची निवड झाल्याबद्दल मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमाने ट्वीट करून आनंद व्यक्त केला. संगमा म्हणाले की, मेघालयाच्या कोंगथोंग गाव भारतातील इतर दोन गावांसोबत UNWTOच्या सर्वोत्तम पर्यटन गावांच्या यादीत सामील केले आहे.

शिलाँगच्या जवळपास ६० किलोमीटर दूर असलेल्या कोंगथोंग गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि विशिष्ट संस्कृतीमुळे लोकप्रिय आहे. हे गाव ‘व्हिसलिंग व्हिलेज’च्या नावाने लोकप्रिय असून हे १२ गावांपैकी एक आहे, जिथे मुलांच्या जन्मापासून त्याच्यासोबत एका विशेष प्रकारचा ध्वनी जोडला होता. आयुष्यभर हा ध्वनी त्याच्यासोबत असतो. आजतागायत ही परंपरा येथे जोपासली जाते.


हेही वाचा – Taliban: तालिबानने पहिल्यांदाच अमेरिकेतील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध


 

- Advertisement -