घर क्राइम अमेरिकेत भारतीय कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत आढळले, अंगावर गोळ्यांच्या खुणा; काय आहे...

अमेरिकेत भारतीय कुटुंबातील तीन जण मृतावस्थेत आढळले, अंगावर गोळ्यांच्या खुणा; काय आहे प्रकरण?

Subscribe

 नवी दिल्ली : अमेरिकेतील (America) मेरीलँड (Maryland) राज्यात एक भारतीय जोडपे आणि त्यांचा सहा वर्षांचा मुलगा मृतावस्थेत आढळून (Indian family found dead) आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी आणि मुलाची हत्या करून व्यक्तीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी शनिवारी (19 ऑगस्ट) सांगितले की, शुक्रवारी (18 ऑगस्ट) दुपारी पोलिसांना तीन लोक बाल्टिमोर काउंटीमधील (Baltimore County) एका घरात मृतावस्थेत आढळले, त्यांच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा आहेत. (Three members of an Indian family were found dead in America with bullet marks on their bodies What is the matter)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश एच नागराजप्पा (37), प्रतिभा वाय अमरनाथ (37) आणि यश होन्नल (6) अशी मृतांची नावे आहेत. कुटुंबातील सदस्यांना शेजाऱ्यांना मंगळवारी संध्याकाळी शेवटचे जिवंत पाहिले होते. पोलिसांनी सांगितले की, तिन्ही मृत भारतीयाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोस्टमॉर्टम करण्यात आले असून सविस्तर अहवाल येण्याची आम्ही प्रतीक्षा करत आहोत. तसेच पोलीस खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसराचाही तपास करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Home Affairs Ministry : गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक तक्रारी; CVCच्या अहवालातील निष्कर्ष

पत्नी, मुलाची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा पोलिसांना अंदाज

अमेरिकेतील एका वृत्तपत्राने बाल्टिमोर काउंटी पोलिसांचे प्रवक्ते अँथनी शेल्टनच्या यांचा हवाला देताना म्हटले की, “प्राथमिक तपासाच्या आधारे, ही घटना योगेश एच नागराजप्पा यांनी आधी आपल्या पत्नीची व मुलाची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. कारण कुटुंबातील प्रत्येकाचा मृत्यू बंदुकीची गोळी लागून झाला आहे. या दुःखद घटनेनंतर कुटुंब आणि समाजातील सदस्यांना मदत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू, असे बाल्टिमोर काउंटीचे कार्यकारी जॉनी ओल्सेव्स्की यांनी निवेदनात म्हटले आहे.

मृत कुटुंब कर्नाटकातील रहिवासी

- Advertisement -

अमेरिकेतील बाल्टिमोर येथे झालेले मृत कुटुंब कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील जगलूर तालुक्यातील हालेकल्लू गावचे होते. गेली नऊ वर्षे ते अमेरिकेत राहत होते. योगेशची एच नागराजप्पाची आई शोभा यांनी सांगितले की, त्यांच्या मुलाचे नऊ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यानंतर तो लगेचच आपल्या पत्नीला घेऊन अमेरिकेला गेला आणि तेव्हापासून तो तिथेच राहत आहेत. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी अमेरिकेत राहणाऱ्या माझ्या दुसऱ्या मुलाला फोन करून या घटनेबद्दल सांगितले, त्यानंतर मुलाने आम्हाला सांगितले.

हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचलेल्या चांद्रयान -3ने पाठविली आनोखी छायाचित्रे

योगेशच्या आईने मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी केले आवाहन

योगेशची एच नागराजप्पाच्या आईने म्हटले की, मुलाचा मृत्यू कधी झाला हे माहित नाही. फक्त माझ्या दुसऱ्या मुलाने पहिल्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी दिली. पण माझ्या आपल्या पत्नीला आणि मुलाला मारले की, दुसरे कोणी केले हे आम्हाला माहित नाही. पण त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी आवाहन केले आहे. योगेशच्या आईने म्हटले की, या घटनेला तीन दिवस झाले आहेत. आम्ही मुलाचा मृतदेह पाहिलेला नाही. मुलाचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदत करा.

- Advertisment -