घरक्राइमगडचिरोलीत MBBS डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक

गडचिरोलीत MBBS डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक

Subscribe

गडचिरोलीत पोलिसांनी एका एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. गस्तीवर असताना पोलिसांना नक्षल्यांचे शहिद सप्ताहाचे बॅनर लावतांना तीन जण सापडले.

गडचिरोलीत पोलिसांनी एका एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. गस्तीवर असताना पोलिसांना नक्षल्यांचे शहिद सप्ताहाचे बॅनर लावतांना तीन जण सापडले. (Three Naxal supporters including MBBS doctor arrested in Gadchiroli)

नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात कंत्राटी सरकारी एमबीबीएस डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना बांधत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपींना अटक केली.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एमबीबीएस डॉक्टर पवन उईकेचा समावेश असल्याचे समजते. डॉक्टरांसह पचडलेल्या तिघांकडून नक्षवाद्यांना रसद पुरवली जात असल्याचा संश पोलिसांना आहे. या तिघांवर ‘बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे’ या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्यंत संवेदनशील दुर्गम भागात पोलिसांनी कारवाई केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवादाची दहशत निर्माण करण्यासाठी हे बॅनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात लावले जात असल्याची माहिती मिळते. या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. याच पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी ऑपरेशन राबवले होते.

- Advertisement -

हेही वाचा – राष्ट्रकूल स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची बाजी; भारतीय महिला संघाचा पराभव

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -