घरताज्या घडामोडीराजस्थानातील खाटू श्यामजी मंदिराचे उघडताच चेंगराचेंगरी; 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

राजस्थानातील खाटू श्यामजी मंदिराचे उघडताच चेंगराचेंगरी; 3 महिलांचा गुदमरुन मृत्यू

Subscribe

राजस्थानातील प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडताच चेंगराचेंगरी झाल्याने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या खाटू श्यामजी मंदिरात सोमवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

राजस्थान : राजस्थानातील प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी उघडताच चेंगराचेंगरी झाल्याने तीन महिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राजस्थानच्या सीकर येथे असलेल्या खाटू श्यामजी मंदिरात सोमवारी सकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत काही जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. (Three people died several injured at Khatu Shyamji Temple in Sikar where a stampede occurred at Rajasthan)

या घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. तसंच जखमी भाविक लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थनाही केली आहे. तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून सर्व प्रशासकीय यंत्रणांना मदतीचे निर्देशही जारी केले आहेत.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

राजस्थानच्या प्रसिद्ध खाटू श्यामजी मंदिराची दर महिन्याला जत्रा भरते. या मासिक जत्रेसाठी आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रावणी सोमवार असल्याने अनेक भाविक दर्शनासाठी मंदिरात दाखल झाले होते. सोमवारी पहाटे पाच वाजता या खाटू श्यामजी मंदिराचे दरवाजे उघडताच भाविकांनी एकत्र आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी या ठिकाणी निर्माण झाली. चेंगराचेंगरी झाल्याने तीन महिलांचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. तर काही जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

या दुर्घनटेत जीव गमावलेल्या महिलांपैकी एक महिला ही हिसारची असल्याची माहिती समोर येत आहे. तर अन्य दोन महिलांची ओळख अद्याप पटलेली नाही. या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी जयपूरला पाठवण्यात आल्याची माहिती मिळते. तसेच, एका जखमीवर खाटू श्यामजी स्थानिक रुग्णालयातच उपचार सुरु आहेत.

मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. पोलिसांकडून सध्या या चेंगराचेंगरीच्या घटनेप्रकरणी चौकशी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या तिघा महिला भाविकांच्या कुटुबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


हेही वाचा –  मुख्यमंत्री नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; पूरग्रस्त हिंगोलीकरांची मदतीची अपेक्षा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -