कर्नाटकात बॉम्बस्फोटाचा कट उधळला; ISIS च्या 3 दहशतवाद्यांना पोलिसांकडून अटक

राज्यात बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. शिवमोगा पोलिसांनी ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 3 जणांना अटक केली आहे.

राज्यात बॉम्बस्फोटाचा कट उधळून लावण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. शिवमोगा पोलिसांनी ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या 3 जणांना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांना ISIS या प्रतिबंधित संघटनेच्या कारवाया वाढवायच्या होत्या, असा पोलिसांनी दावा केला आहे. (three people with isis links arrested by shivamogga police in karnataka)

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या सदस्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. संबंधित तिघेजण कर्नाटकात स्फोट घडवण्याची योजना आखत होते. तिन्ही दहशतवादी शिवमोगा येथील रहिवासी आहेत. शारिक, माजी आणि सय्यद यासीन अशी आरोपींची नावे असून, या तिघांविरुद्ध आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या (यूएपीए) विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस एफआयआरनुसार, टोळीचे सदस्य भारताच्या एकता, अखंडता आणि सार्वभौमत्वाला हानिकारक असलेल्या आयएसच्या कारवाया पुढे करण्याचा विचार करत होते. राज्याचे गृहमंत्री अरगा जनेंद्र यांनी दहशतवाद्यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे. तिघांचेही आयएसशी संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले की, “त्यांच्या कारवायांची कसून चौकशी केली जात आहे. ते मंगळुरुशी संबंधित असलेल्या शिवमोग्गा आणि तीर्थहल्ली येथील आहेत.

याशिवाय, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी स्फोटासोबतच प्रशिक्षणही घेतल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. दरम्यान, किंगपिन यासीन देखील ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. यासीन हा इलेक्ट्रिकल इंजिनीअर आहे.


हेही वाचा – खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पध्दत; पत्राचाळ प्रकरणी ईडीने शरद पवारांचे नाव घेतलेले नाही : महेश तपासे