घरदेश-विदेशराहुल गांधींच्या रोड शोदरम्यान तीन पत्रकार जखमी

राहुल गांधींच्या रोड शोदरम्यान तीन पत्रकार जखमी

Subscribe

केरळच्या वायनाड मतदारसंघात उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोदरम्यान तीन पत्रकार जखमी झाले आहेत.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाड या मतदारसंघातून लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. आज त्यांनी उमेदवारीचा अर्ज भरला. उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर रोड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोड शो दरम्यान गोंधळ झाला. ट्रकचा रॉड तुटून पडल्यामुळे तीन पत्ररकार जखमी झाले. या पत्रकारांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच राहुल गांधी आणि काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशचे सरचिटणीस प्रियंका गांधी जखमी पत्रकारांसोबत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचले होते.

- Advertisement -

हेही वाचा –राहुल गांधी यांचा वायनाडमधील उमेदवारी अर्ज दाखल

दोन मतदारसंघातून राहुल गांधी लढवणार निवडणूक

राहुल गांधी अमेठी आणि वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. आज वायनाड मतदारसंघासाठी राहुल गांधींनी उमेदवारीचा अर्ज भरला. अमेठीमध्ये राहुल गांधींचा सामना बाजपच्या स्मृती इराणी यांच्यासोबत असणार आहे. तर वायनाड येथे राहुल गाधींचा सामना केरळमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटकपक्ष अलेल्या भारत धर्मा जन सभेचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांच्यासोबत असणार आहे. दरम्यान, आज वायनाड येथे उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी राहुल गांधींसोबत प्रियंका गांधीदेखील आल्या होत्या.

- Advertisement -

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -