घरदेश-विदेशतीन शास्त्रज्ञांना वैद्यकीय शास्त्राचे नोबेल जाहीर

तीन शास्त्रज्ञांना वैद्यकीय शास्त्राचे नोबेल जाहीर

Subscribe

कोशिकांकडून ग्रहण केल्या जाणार्‍या ऑक्सिजनबाबत शोधकार्यासाठी यंदाचे वैद्यकीयशास्त्राचे नोबेल तीन शास्त्रज्ञांना विभागून जाहीर करण्यात आले आहे. विल्यम जी. केलिन ज्युनियर, सर पीटर जे. रॅटक्लिफ आणि ग्रेग एल. सेमेंजा अशी या तीन शास्त्रज्ञांची नावे आहेत. या शास्त्रज्ञांच्या शोधामुळे शरीरातील ग्रंथींचे कार्य समजण्यास मदत झाली असून कर्करोगावर प्रकाश पडला असल्याचे नोबेल पुरस्कार समितीकडून जाहीर करण्यात आले आहे.

नोबेल पुरस्कार समितीने शरीरशास्त्रातील पुरस्कारासंबंधीची माहिती ट्विट करून दिली. यंदा तीन जणांना संयुक्तपणे हा पुरस्कार जाहीर झाला. कोशिकांची कार्यपद्धती आणि त्यांच्याकडून केले जाणारे ऑक्सिजन ग्रहण याविषयी केलेल्या संशोधनासाठी तिन्ही वैज्ञानिकांना नोबेल पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्काराबद्दल सर पीटर जे. रॅटक्लिफ यांनी आनंद व्यक्त केला. पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी ते ईयू सिनर्जी ग्रँट अ‍ॅप्लिकेशनमधील त्यांच्या कार्यालयात ते काम करत होते.

- Advertisement -

अमेरिकन शास्त्रज्ञ विल्यम जी. केलिन ज्युनियर यांचा जन्म १९५७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांनी डरहम विद्यापीठातून एमडीची पदवी घेतली आहे. बाल्टिमोर के. जॉन हॉपकिंग्स विद्यापीठ आणि बोस्टनच्या दाना-फार्बर कर्करोग संस्थेतून त्यांनी इंटर्नल मेडिसीन आणि ऑन्कोलॉजीमध्ये विशेष प्रशिक्षण घेतले आहे.

सर पीटर जे. रॅटक्लिफ यांचा जन्म इंग्लंडमधील लँकशायरमध्ये १९५४ मध्ये झाला. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाच्या गोन्विले आणि साइअस महाविद्यालयातून औषधांचा अभ्यास केला आहे. यासोबतच त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून नेफ्रोलॉजीचं प्रशिक्षण घेतलं आहे.

- Advertisement -

ग्रेग एल. सेमेंजादेखील न्यूयॉर्कचे रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९५६ साली झाला. त्यांनी हावर्ड विद्यापीठातून बायोलॉजी विषयामधून पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी पेन्सिवेनिया विद्यापीठातून त्यांनी एमडी/पीएचडीदेखील घेतली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -