घरदेश-विदेशराम मंदिरासाठी राज्यसभेत खासगी विधेयक आणणार - राकेश सिन्हा

राम मंदिरासाठी राज्यसभेत खासगी विधेयक आणणार – राकेश सिन्हा

Subscribe

राज्यसभेत राम मंदिराच्या निर्मितीसाठी खासगी विधेयक आणले तर त्यावर डावे पक्ष आणि काँग्रेस काय भूमिका घेतील, ते या विधेयकाचे समर्थन करतील का, असा सवालही सिन्हा यांनी उपस्थित केला आहे.

भाजपचे राज्यसभा सदस्य राकेश सिन्हा यांनी अयोध्येत राम मंदिराच्या निर्मीतीसाठी आता राज्यसभेत खासगी विधेयक मांडण्याची तयारी चालवली आहे. खासदार राकेश सिन्हा यांनी ट्वीटर राम मंदिर निर्मितीसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरभेत खासगी विधेयक मांडणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यसभेत खासगी विधेयक आणणार

सर्वोच्च न्यायलयाने गेल्या २९ ऑक्टोबर रोजी राम जन्मभूमी- बाबरी मशिद प्रकरणाची सुनावणी स्थगित केली आहे. तसेच या प्रकरणाची सुनावणी कधी सुरू करायची यासंदर्भात जानेवारी २०१९ मध्ये निर्णय घेणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी संघटना आणि जनतेकडून राम मंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा करण्याची मागणी होते आहे. यापार्श्वभूमीवर सिन्हा यांनी संसदेच्या हिवळी अधिवेशनात राज्यसभेत खासगी विधेयक आणणार असल्याचे आपल्या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

- Advertisement -

ट्विटरवरुन दिली माहिती

आपल्या ट्वीटच्यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सिन्हा म्हणाले की, जर त्यांनी राज्यसभेत राम मंदिराच्या निर्मितीसाठी खासगी विधेयक आणले तर त्यावर डावे पक्ष आणि काँग्रेस काय भूमिका घेतील, ते या विधेयकाचे समर्थन करतील का, असा सवालही सिन्हा यांनी उपस्थित केला आहे. राकेश सिन्हांनी ट्विट करत राहुल गांधी, सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव आणि मायावतींना राम मंदिराच्या खासगी विधेयकाला समर्थन करणार का, असा प्रश्न विचारला आहे. विरोधी पक्षाचे नेते राम मंदिर निर्मितीच्या तारखेवरुन भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधत आहेत. पण यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि उत्तर द्यावे असे आव्हानही सिन्हा यांनी दिले आहे.

राम मंदीर सर्वोच्च प्राथमिकता

या ट्वीटसोबतच सिन्हा यांनी आणखी एक ट्विट करत म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाला कलम ३७७, जलीकट्टू आणि शबरीमलावर निर्णय देण्यासाठी किती काळ लागला, पण मला वाटते की, अयोध्या प्रकरण दशकानुदशके त्यांची प्राथमिकताही राहिलेली नाही. हिंदू समाजामध्ये राम मंदीर सर्वोच्च प्राथमिकता आहे. सिन्हा यांच्या या वक्तव्यानंतर कायद्याच्या माध्यमातून राम मंदीर उभारण्याचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरण्याची शक्यता वर्तवली जातेय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -